शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनाधीन बापामुळे तीन मुलं झाली कायमची पोरकी

By admin | Updated: August 31, 2014 23:47 IST

ओरी-मधलीवाडीतील हृदयद्रावक घटना; तिन्ही मुलांचे जीवन बनलेय अंधकारमय

रहिम दलाल - रत्नागिरी  -आईला ठार मारल्यानंतर वडिलांनीही पोलीस कोठडीत आत्महत्या केल्यानंतर तीन कोवळ्या जीवांच्या डोक्यावरचं छत्रच हरपले. आता या तिघानाही वृध्द आजी आणि लहान काकांचाच आधार उरला असला तरी या तिघांचेही जीवन आंधारमय झाले आहे.थोडीफार शेती आणि मोलमजुरी करुन जगणाऱ्या ओरी-मधलीवाडीतील वेलोंदे कुटुंबातील घरचा पुरूष काळ बनून आल्याने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले. व्यसनाधीन झालेला अंकुश महादेव वेलोंदे हा आपली पत्नी अपर्णा, आई वनिता, भाऊ अमित, मुली अमिषा, नंदिनी आणि मुलगा मनीष अशा कुटुंबासह राहात होता. तो मोलमजुरी करायचा. दारुच्या आहारी गेलेला अंकुश अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण करीत असे. काही वेळेला मुलांनाही त्याच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. एकदा तर त्याने मोठ्या मुलीच्या डोक्यात दगड घातला होता. मात्र, सुदैवाने ती बचावली होती. मुलगी अमिषा इयत्ता सहावीत, मनीष पाचवीत आणि नंदिनी तिसरीच्या वर्गामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. तिन्ही मुलं शाळेत हुशार मुलांमध्ये गणली जात आहेत. गणेश चतुर्थी असल्याने ही तिन्ही मुलं आपल्या आई व आजीसह घरातच मोठ्या आनंदात होती. आपल्या कुटुंबावर एवढे मोठे संकट येणार आहे, याचा विचारही या कुटुंबातील कोणी सदस्याने केला नसेल. शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणेच अंकुश दारुच्या नशेत घरी आला. त्यानंतर त्याने पत्नी अपर्णाला नेहमीप्रमाणेच शिव्या देण्यास सुरुवात केली. मात्र, ही बाब नेहमीची असल्याने मुलांनाही नवी नव्हती. दारुच्या नशेत असलेल्या अंकुशने घरात असलेला गाडीचा लोखंडी पाटा उचलला आणि अपर्णाला मारहाण करण्यास सुरुवात केली. पाटा अपर्णाच्या डोक्यात हाणल्याने ती रक्तबंबाळ होऊन गतप्राण झाली. आई गेल्याने मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच शनिवारी अंकुशनेही पोलीस कोठडीत आत्महत्या केली. त्यामुळे या तिन्ही मुलांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचे छत्र हरवले. त्यांचे भविष्यच जणू अंधकारमय झाले आहे. दारुच्या व्यसनाने अंकुशने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं. आता ती तिन्ही मुलांचे जीवन आंधारमय झालं आहे. आजीही वृध्द झाल्याने तिचा आधार कुठपर्यंत मिळणार आहे. व्यसनाधीन झालेल्या अंकुशला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला होता. अखेर त्यांने व्यसनाच्या भरात स्वत:सह पत्नीचाही घात करुन मुलांना वाऱ्यावर सोडले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण ओरी परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.