शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

तब्बल ४२ तासांचे अथक परिश्रम, अखेर देवमाशाचे पिल्लू खोल समुद्रात रवाना

By मनोज मुळ्ये | Updated: November 15, 2023 16:07 IST

गणपतीपुळे येथे सोमवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता देवमाशाचे पिल्लू समुद्रकिनारी आढळले.

गणपतीपुळे, रत्नागिरी : अनेक सरकारी यंत्रणा, अनेक ग्रामस्थ, खासगी कंपन्या, पर्यटक अशा शेकडो हातांच्या परिश्रमांमुळे गणपतीपुळे समुद्रकिनारी अडकलेले देवमाशाचे पिल्लू तब्बल ४२ तासांनी सुखरुप खोल समुद्रात पोहोचले.

वनविभाग, ग्रामपंचायत गणपतीपुळे, स्थानिक पोलिस प्रशासन, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, महसूल विभाग, एमटीडीसी गणपतीपुळे, बोट क्लब गणपतीपुळे, जिंदल कंपनी, वाईल्ड लाईफ पुणे रेस्क्यू टीम तसेच असंख्य स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी मिळून ही मोहीम यशस्वी केली.

गणपतीपुळे येथे सोमवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता देवमाशाचे पिल्लू समुद्रकिनारी आढळले. तीस फूट लांब आणि सुमारे तीन ते साडेतीन टन वजन असलेल्या या देवमाशाच्या पिल्लाचे वय पाच ते सहा महिने असल्याचा अंदाज आहे.प्रथम एमटीडीसीचे कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने त्याला समुद्रात आतमध्ये नेऊन सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मासा पुन्हा समुद्रकिनारी लागत होता. ही बातमी पसरताच किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वाळूत अडकलेल्या माशाला तीनवेळा समुद्रात ढकलण्यात आले. मात्र तीनही वेळा तो बाहेर आला.

खोल समुद्रात जाण्याइतके त्राण या माशामध्ये नसावेत, अशा अंदाजाने त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुणे येथून वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम बोलावण्यात आली. या टीमने आठ सलाईन व तीन अँटिबायोटिक इंजेक्शन दिल्यानंतर हा मासा तरतरीच झाला. मात्र सायंकाळी भरतीची वेळ नसल्याने या माशाला जिवंत ठेवण्यासाठी त्याला पाणी उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याने एमटीडीसी कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांनी समुद्राच्या पाण्याचा मारा करून माशाला जिवंत ठेवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले. पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीमने तसेच वनविभागाने माशावर वेळीच योग्य उपचार केल्याने तो जगू शकला.

सोमवार सकाळपासून अव्याहतपणे हे प्रयत्न सुरूच होते अखेर मंगळवारी रात्री ११:३० वाजता जिंदल कंपनीचे जहाज (टग) व तटरक्षक दलाच्या बोटने या माशाला खोल समुद्रात व्यवस्थित व सुखरूप नेण्यात यश आले.

यावेळी वनविभागाच्या  विभागीय वनअधिकारी  गिरजा देसाई, सहाय्यक वनअधिकारी वैभव बोराटे परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल एन एस गावडे, सदानंद घाडगे, वनरक्षक मिताली कुबल, सहयोग कराडे, विक्रम कुंभार, सुजल तेली, आर डी पाटील, नायब तहसीलदार कांबळे तसेच तटरक्षक दलाचे कर्मचारी, जिंदल कंपनी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळवी व पोलिस कर्मचारी, गणपतीपुळेचे ग्रामसेवक प्रवीण चौधरी व जीव रक्षक यांच्यासह एम टी डी सी चे व्यवस्थापक वैभव पाटील, सहाय्यक व्यवस्थापक रुपेश करंडे कर्मचारी तसेच  अनेक ग्रामस्थ व पर्यटकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी