लांजा : मॅगझीमो व होडाडिओ दुचाकी यांच्यामध्ये आंजणारी घाटामध्ये झालेल्या अपघातात नाणीज येथील ३६ वर्षीय गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा सोमवारी रात्री उपचारादरम्याने मृत्यू झाला आहे. समीर सुभाष दडी असे मृत्यू झालेल्या प्रौढाचा नाव असून, हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्याने घडला.राजापूर तालुक्यातील सौंदळ मुस्लिमवाडी येथील अल्लाउद्दीन बावा लांजेकर (२६) हे मॅगझीमो टेम्पो (एमएच ४८, टी १७१३)मधून आपल्या आई-वडिलांना डोळे तपासणीसाठी रत्नागिरीत घेऊन गेले होते. तपासणी करून सौंदळ येथे आपल्या घरी परतत होते.आंजणारी घाट उतरत असताना लांजाहून पालीच्या दिशेने नाणीज येथील समीर सुभाष दडी (३६) हा होंडा डिओ दुचाकी (एमएच ०८, एयु ०७६२) घेऊन येत होता. भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येऊन मॅगझीमो टेम्पोवर धडकला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्याला उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या अपघाताचा अधिक तपास राजेंद्र कांबळे हे करीत आहेत.
अपघातातील जखमी प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 16:35 IST
Accident Ratnagiri- मॅगझीमो व होडाडिओ दुचाकी यांच्यामध्ये आंजणारी घाटामध्ये झालेल्या अपघातात नाणीज येथील ३६ वर्षीय गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा सोमवारी रात्री उपचारादरम्याने मृत्यू झाला आहे. समीर सुभाष दडी असे मृत्यू झालेल्या प्रौढाचा नाव असून, हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्याने घडला.
अपघातातील जखमी प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
ठळक मुद्देअपघातातील जखमी प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यूउपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले होते