शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

लांजात अचानक झालेल्या स्फोटात प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 14:01 IST

लांजा : अचानक झालेल्या स्फोटात शिपोशी - बौध्दवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजता घडली. ...

ठळक मुद्देलांजात अचानक झालेल्या स्फोटात प्रौढाचा मृत्यूमासेमारीसाठीच्या पदार्थाचा स्फोट झाल्याचा अंदाज

लांजा : अचानक झालेल्या स्फोटात शिपोशी - बौध्दवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजता घडली. नेमकी कोणती स्फोटके होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिपोशी येथील रमेश बंडू मोहिते (४५) याची पत्नी व दोन मुली विभक्त राहतात. रमेश घराशेजारी झोपडीत राहत होता. गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रमेश घरात काहीतरी काम करत होता. शेजारी शेतामध्ये त्याचा मोठा भाऊ प्रकाश याला रमेशच्या झोपडीतून स्फोटाचा आवाज आला. त्यामुळे प्रकाशने रमेशच्या झोपडीकडे धाव घेतली. त्यावेळी रमेश हा छातीवर हात धरून झोपडीबाहेर धडपडत आला.

छातीला जोरदार इजा झाल्याने छातीतून रक्त वाहत होते. प्रकाशने ग्रामस्थांच्या मदतीने रमेशला आपल्या घरी आणले. छातीतून होत असलेला रक्तस्त्राव थांबविण्यासाठी त्याच्या छातीवर कापड दाबून ठेवले होते. रमेशच्या झोपडीत भाकरीचा तवा होता. स्फोट झाला त्यावेळी तवा त्याच्या छातीवर आपटून तो गंभीर जखमी झाला असल्याचा अंदाज आहे. त्याला उपचारासाठी हलविण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मृत्यू झाला.ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय धुमासकर, हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे, नितीन पवार, राजेश वळवी, नरेश कदम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रमेश याला मासेमारी करण्याचा छंद होता. त्यासाठीच्या पदार्थाचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी