खेड : एका डॉक्टरचे काम करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना खेडमधील एक प्रशासकीय अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईनंतर प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.असंख्य जणांकडे काम पूर्ण करून देण्यास पैशाची मागणी करणाऱ्या या अधिकाऱ्याला स्थानिक नागरिकही कंटाळले होते. शेवटी सोमवारी रात्री खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि भरणे ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून काम पाहणारा अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला.या अधिकाऱ्याला एका डॉक्टरचे काम करण्यासाठी ७००० रुपयांची लाच घेताना खेड रेल्वे स्टेशन परिसरपासून जवळ महामार्गावरील शेजारील हॉटेलमध्ये लाच घेताना पकडण्यात आले आहे. रात्री या अधिकाऱ्याला लाच लूचपत विभागाने ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू केली आहे.
खेडमध्ये प्रशासकीय अधिकारी लाच घेताना ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 13:25 IST
एका डॉक्टरचे काम करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना खेडमधील एक प्रशासकीय अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईनंतर प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खेडमध्ये प्रशासकीय अधिकारी लाच घेताना ताब्यात
ठळक मुद्देखेडमध्ये प्रशासकीय अधिकारी लाच घेताना ताब्यातसोमवारी रात्री केली कारवाई