शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे चौपदरीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:19 IST

highway Chiplun Ratnagiri- यापुढे प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत. अगदी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. काम सुरू केले तर दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पेढे-परशुराम संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देयापुढे चौपदरीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य नाही पेढे-परशुराम संघर्ष समितीचा इशारा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जमिनीच्या कुळांची प्रशासनाला सहकार्य करण्याची मानसिकता आता राहिलेली नाही. उलट संबंधित शेतकरी आत्महत्या व आत्मदहन करण्याच्या तयारीत आहेत.

या परिस्थितीला परशुराम देवस्थान जबाबदार असून, त्यांच्या दबावाखाली प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत. अगदी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. काम सुरू केले तर दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पेढे-परशुराम संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला.पेढेचे सरपंच प्रवीण पाकळे यांनी सांगितले की, पेढे व परशुराम येथील नुकसानभरपाईच्या वादावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री परब यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना रत्नागिरीत बैठकीसाठी निमंत्रित केले होते.

या बैठकीत पालकमंत्री डॉ. अनिल परब यांनी न्यायालयीन बाबींसाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले, तर ही समस्या मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर समिती नेमण्याबाबत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. त्यावर ग्रामस्थ व संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही. याबाबत समिती अध्यक्ष विश्‍वास सुर्वे, जनार्दन मालवणकर, सुधीर गमरे म्हणाले की, मुळात १९७२ मध्ये सातबाऱ्यावर देवस्थानचे नाव चुकीच्या पद्धतीने लागले आहे.आत्मदहनाचा मार्ग?५० वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागलेला नाही. त्यातच या विषयावरून नव्याने दावे दाखल झालेले आहेत. वर्षानुवर्षे या समस्या मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ आत्मदहन करण्याच्या मार्गावर आहेत.भरपाईचा तिढा आधीपेढे व परशुराम या दोन्ही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांची महामार्गाचे काम सुरू करू देण्यास मानसिकता राहिलेली नाही. समिती, ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान सुरू आहे. लोकप्रतिनीधीही हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने भरपाईचा तिढा अगोदर सोडवावा. त्यानंतर काम सुरू करावे, असे सांगितले. यावेळी संघर्ष समितीचे सचिव सुधीर गमरे, तुषार गमरे, संदीप माळी उपस्थित होते.

टॅग्स :highwayमहामार्गChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी