शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या कल्पना चांगल्या! अंमलबजावणीचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:16 IST

केवळ पर्यटनातून जिल्ह्याचा विकास शक्य आहे. मात्र त्यात खूप अडचणी आहेत. अतिवृष्टी, पुरामुळे पावसाळ्यात पर्यटक कोकणात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन हा बारमाही व्यवसाय होत नाही. त्याला उद्योगांची जोड गरजेची आहे.

मनोज मुळ्येरत्नागिरी : पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा विकास, बीच शॅक्स, निवास न्याहरी योजनेबाबतचे धोरण या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्यात मांडलेल्या याेजना उत्तम आहेत. कोकण हिताच्या आहेत; पण त्याच्या अंमलबजावणीबाबत तितकेच गांभीर्य दाखवले जाणे गरजेचे आहे. अनेकदा योजना उत्तम तयार होतात, मात्र अंमलबजावणीच्या स्तरावर त्याची गडबड होते आणि त्यातून कोणालाच फायदा होत नाही.आदित्य ठाकरे यांनी तब्बल तीन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोकणचा शाश्वत विकास या मुद्द्यावर भर दिला. इथले पर्यावरण, निसर्ग टिकवून स्थानिकांच्या हाताला काम मिळवून देणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पर्यटन विभाग आखत असलेल्या योजनांवर त्यांनी भाष्य केले. त्याचवेळी उद्योग, मोठे प्रकल्प याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. युवा पिढीतील नेतृत्त्वाकडून याच अपेक्षा आहेत.मंत्री ठाकरे यांनी मांडलेल्या कल्पना, पर्यटन विभाग राबवणार असलेली धोरणे हे सर्व कागदावर चांगलेच आहे. पण त्या केवळ कागदावर चांगल्या असल्याने कोकणाचा विकास होणार नाही. त्यासाठी कदाचित मोठी आर्थिक तरतूदही होईल; पण जोपर्यंत त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही, तोपर्यंत त्या फायद्याच्या ठरणार नाहीत. त्यासाठी योजनांचा पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी आणि लाभ घेणारे स्थानिक या साऱ्यांचा त्यातील प्रामाणिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जर या गोष्टींकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष ठेवले तर कोकणाच्या अर्थकारणाला वळण लागू शकेल, हे नक्की.बीच शॅक्स धोरण लवकरचकोकण दौऱ्यात सर्व ठिकाणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक्स आणि होम स्टे (निवास न्याहरी योजना) यावर भर दिला. सीआरझेडमध्ये काही प्रमाणात शिथिलता गरजेची आहे. ती मिळाल्यानंतर बीच शॅक्सची उभारणी शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपला प्रस्ताव तयार करून दिला आहे. त्यावर दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित आहे.पर्यटन बारमाही नाही, उद्योगाची जोड हवीचकेवळ पर्यटनातून जिल्ह्याचा विकास शक्य आहे. मात्र त्यात खूप अडचणी आहेत. अतिवृष्टी, पुरामुळे पावसाळ्यात पर्यटक कोकणात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन हा बारमाही व्यवसाय होत नाही. त्याला उद्योगांची जोड गरजेची आहे.होम स्टे पॉलिसी

  • कोकणात येणाऱ्या पर्यटकांना घरगुती वातावरणात राहता यावे आणि स्थानिकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून निवास न्याहरी (होम स्टे) योजना राबवली जाते.
  • ज्या लोकांनी पर्यटकांची आपल्या घरी व्यवस्था केली आहे, त्यांना काही कर भरावे लागतात, त्यांना वीज बिल वाणिज्य स्वरुपाचे येते. त्यासाठी त्याचे एक धोरण निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
  • असा व्यवसाय करणार्यांना काही सवलती दिल्या जाणार आहेत. तसे झाल्यास हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढेल. थोडक्यात स्थानिकांना हक्काचे काम मिळेल.

मंत्री उदय सामंत यांचा विशेष पुढाकारबीच शॅक्सबाबत मंत्री उदय सामंत गेला बराच काळ पाठपुरावा करत आहेत. गोव्याकडे जाणार्या पर्यटकांची पावले रत्नागिरी जिल्ह्यातच थांबवण्यासाठी गोव्यासारख्या योजना राबवणे गरजेचे आहे, हे ओळखून ते सतत बीच शॅक्सबाबत पाठपुरावा करत आहेत. त्यातून ती योजना आकाराला येत आहे. अर्थात अंमबजावणीकडे त्यांना विशेष लक्ष द्यावे लागेल, हे निश्चित.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरे