शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

आधी मतदान आणि मग बाकी सर्व काम, सेलिब्रिटींचे रत्नागिरीकरांना आवाहन

By मनोज मुळ्ये | Updated: April 8, 2024 17:44 IST

रत्नागिरी : मतदानामध्ये वाढ व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन विविध पर्यायांचा वापर करत असून, क्रिकेटपटू प्रवीण आमरे व प्रसिद्ध निर्माता, ...

रत्नागिरी : मतदानामध्ये वाढ व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन विविध पर्यायांचा वापर करत असून, क्रिकेटपटू प्रवीण आमरे व प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर यांनीही रत्नागिरीकरांनामतदानाचे आवाहन केले आहे.नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर गेले अनेक दिवस रत्नागिरीमध्ये आहेत. त्यांनी चित्रिकरणादरम्यान वेळ काढून रत्नागिरीकरांना मतदानाचे आवाहन केले आहे. त्याचा एक व्हिडिओ जिल्हा प्रशासनाकडून सर्वांना पाठवला जात आह. यात सुप्रिया पिळगावकर म्हणतात की, समस्त रत्नागिरीकर मंडळींना आमचा नमस्कार. मंडळी, नेत्रदान, रक्तदान, त्वचादान, देहदान हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे, मतदान.सचिन पिळगावकर म्हणतात की, संविधानानं आपल्याला दिलेला हक्क, अधिकार, कर्तव्य बजावून आपल्याला देशाची सेवा केलीच पाहिजे. समस्त रत्नागिरीकरांना आमचं आवाहन आहे की ७ मे रोजी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा. या दिवशी वेळात वेळ काढून मतदान करा. लक्षात ठेवा आधी मतदान आणि मग बाकी सर्व काम, असे आवाहन या सेलिब्रिटी जोडप्याने केले आहे.लोकांच्या मनावर चित्रपट आणि क्रिकेटचा खूप मोठा पगडा असतो. त्यांचे अनुकरण करणं हा ट्रेंडच आहे. नेमका हाच धागा पकडून प्रशासनाने लोकांना मतदानाबाबत जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे.

येत्या ७ मे रोजी लोकसभेची निवडणूक होत आहे. जगात सर्वात मोठी असणाऱ्या आपल्या भारतीय लोकशाहीचा हा उत्सवच आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या युवक-युवतींना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो. तुमच्या प्रत्येकाच्या एक-एक मताने आपली लोकशाही आधिक बळकट होणार आहे. या मतदानात आपले मार्गदर्शक ठरलेले ज्येष्ठ मतदार नेहमी आग्रेसर असतात. त्यांचा हाच आदर्श आपण घेऊया आणि त्यांच्या बरोबरीने आपण सर्वजण मतदान करुया..! - प्रवीण आमरे, निवृत्त भारतीय क्रिकेटपटू

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVotingमतदानSachin Pilgaonkarसचिन पिळगांवकर