शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अनिल विभुते म्हणाले, रिक्षा दिसल्यास कारवाई करणार; रिक्षा वाहतुकीला परवानगी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:56 IST

याबाबत पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले की, रिक्षा व्यवसासाला शासनाने परवानगी दिलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणीही रिक्षा रस्त्यावर आणू नये. रिक्षा रस्त्यावर फिरताना दिसल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल,

ठळक मुद्दे वाहतूक निरीक्षक अनिल विभुते यांची माहिती -

रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही रस्त्यावर रिक्षा फिरताना दिसत असून, रस्त्यावर रिक्षा दिसल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिला आहे.सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही शिथिलता आणण्यात आली आहे. आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकाने स्वयंशिस्तीने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नियमांमध्ये शिथिलता आणताना काही कडक निर्बंधही घालण्यात आले आहेत. शासनाने नवीन नियमानुसार चारचाकी वाहनातून चालक आणि त्याचे सोबत अन्य दोन प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तसेच  दुचाकीवरून केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकते, असे सांगण्यात आले आहे.सोमवारी नियम शिथील केल्यानंतर रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांसह वाहनांचीही गर्दी दिसत होती. त्यातच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये टॅक्सी आणि कॅब यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आल्याने रिक्षा व्यावसायालाही परवानगी दिल्याचा अनेकांनी समज करून घेतला. त्यामुळे सोमवारी अनेक रिक्षाचालकांनी आपली वाहने रस्त्यावर आणली होती.  गेले दीड महिन्यापासून व्यवसाय बंद ठेवून राहिलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी सोमवारपासून व्यवसायाला पुन्हा सुरूवात केली. मात्र, त्यांना कारवाईचा सामना करावा लागला.याबाबत पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले की, रिक्षा व्यवसासाला शासनाने परवानगी दिलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणीही रिक्षा रस्त्यावर आणू नये. रिक्षा रस्त्यावर फिरताना दिसल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ही कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण