शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

होडकाड प्रौढाचा खूनप्रकरणी केवळ ६ तासात आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 11:25 IST

खेड तालुक्यातील होडकाड येथे वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार करून नारायण शिगवण या प्रौढांचा खून करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले आहे.

ठळक मुद्देहोडकाड प्रौढाचा खूनप्रकरणी केवळ ६ तासात आरोपी गजाआडखेड पोलिसांची कामगिरी, माही श्वानाची महत्वाची भूमिका

खेड : तालुक्यातील होडकाड येथे वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार करून नारायण शिगवण या प्रौढांचा खून करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले आहे. रुपेश शिगवण (२६) असे आरोपीचे नाव असून, तो त्याच गावातील आहे. आरोपीला पकडण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातील 'माही' या श्वानाने महत्वाची भूमिका बजावली. पैशांच्या देवाण-घेवाणावरून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.होडकाड वरचीवाडी येथील नारायण शिगवण या ५० वर्षीय प्रौढांचा मंगळवारी रात्री खून झाला होता. पोलिसांना त्याचा मृत्यूदेह होडकाड एस.टी. स्टॉप पासून ५० मीटर अंतरावर जंगलमय भागात आढळला होता. पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. या कामी पोलिसांनी रत्नागिरी पोलीस दलातील 'माही' या श्वानांची मदत घेतली होती.नारायण शिगवण यांचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता. त्याठिकाणी 'माही'ला नेल्यानंतर 'माही'ने थेट आरोपीचे घर गाठले होते. तिथेच पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. पोलिसांनी तत्काळ या घरातून रुपेश शिगवण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशी दरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खास पोलिसी पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर त्याने नारायण शिगवण यांच्या डोक्यात, गुप्तांगावर, तोंडावर काठीने प्रहार करून त्यांना ठार मारल्याची कबुली दिली. या हत्येमागेचे कारण पैशांची देवाण-घेवाण असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.पोलिओमुळे अपंग असलेले नारायण शिगवण हे गाव व परिसरातील नागरिकांना आवश्यक असणारे शासकीय दाखले काढून देणे, पंचायत समिती, महसूल विभागाशी संबंधित असलेली कामे करून देत असत. आरोपी रुपेश यांच्याकडूनही त्यांनी त्याच्या आजोबांचा दाखल काढून देण्यासाठी दहा हजार रुपये घेतले होते.

चार वर्ष उलटून गेली तरी नारायण शिगवण यांनी रुपेश याला हवा असलेला दाखल दिला नव्हता. नोकरीसाठी मुंबईला असलेला रुपेश हा लॉकडाऊनमुळे सध्या गावी आला आहे. गावी आल्यापासून त्याने नारायण शिगवण यांच्याकडे दाखल्यासाठी भुणभुण लावली होती. मात्र, नारायण यांनी त्याच्याकडे पुन्हा ४ हजार रुपयांची मागणी केली.दाखल्याची आवश्यकता असल्याने रुपेश याने नारायण यांना आणखी ४ हजार रुपये दिले. मात्र, तरीही रुपेश याला दाखल मिळाला नाही. मंगळवारी रुपेश आणि नारायण यांची होडकाड एसटी स्टॉप येथे गाठ पडली. तेव्हा रुपेश याने नारायण यांना दाखल्याबाबत विचारले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

या दरम्यान रुपेश याचा राग अनावर झाल्याने त्याने हातातील काठीने नारायण यांच्यावर प्रहार केला. हा प्रहार नारायण यांच्या वर्णी बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रुपेश याने नारायण यांना एस. टी. स्टॉप वरून ओढत जंगलमय भागात नेले. इथेही त्याच्या गुप्तांगावर आणि तोंडावर काठीने प्रहार केले.

नारायण यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर रुपेश घरी आला. तपासादरम्यान पोलिसांच्या 'माही' श्वानानाने रुपेश याचेच घर पोलिसांना दाखवले आणि रुपेश पोलिसांच्या हाती लागला. खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी