शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेनळी घाटात खेडमधील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:54 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शन घेऊन परतणाऱ्या खेड तालुक्यातील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. ही मिनी बस एका आंब्याच्या झाडावर धडकल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथील १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देआंबेनळी घाटात खेडमधील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघातदिवाण खवटी येथील १९ प्रवासी जखमी

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शन घेऊन परतणाऱ्या खेड तालुक्यातील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. ही मिनी बस एका आंब्याच्या झाडावर धडकल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथील १९ प्रवासी जखमी झाले आहेत.खेड तालुक्यातील दिवाण खवटी गावातील १९ वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शनिवारी पहाटे निघाले होते. पोलादपूर - महाबळेश्वर - वाई - सुरूर या मार्गावरून आंबेनळी घाटातून त्यांची चालक नितेश सावंत हे मिनीबस (एमएच ०४, एफएक्स १६३२) ही पोलादपूर तालुक्यातील आड कुंभळवणे गावादरम्यान तीव्र वळणावर आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली.या अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये सहादेव विठू साळवी, गंगाराम गणपत साळवी, शिवाजी शेलार, जयवंती गंगाराम साळवी, शेखर काशीराम कदम, महादेव तुकाराम साळवी, परशुराम बाळाराम कदम, देवजी गोपाळ साळवी, वसंत साळवी, प्रतिभा कदम, प्रणाली साळवी, शांता साळवी, प्रमिला साळवी, पार्वती साळवी, चंद्रभागा कदम रोहिणी काजारे, अनिता काजारे, तुकाराम काशिराम काजारे आधी १९ प्रवासी जखमी झाले.

पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये तातडीने जखमींवर उपचार करण्यात आले. या उपचारानंतर सहदेव साळवी, पार्वती साळवी, शांता साळवी, प्रतिभा कदम, आणि चालक नितेश सावंत यांना गंभीर दुखापतीमुळे पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले.पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिंडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ग्रामीण रूग्णालयामध्ये जखमींकडून अपघाताची माहिती घेण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीKhedखेड