शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार, कोकणात आढळतात गरम पाण्याचे झरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:33 IST

- महेश कदम, रत्नागिरी कोकण भूमीत आढळणारे गरम पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती हजारो ...

- महेश कदम,रत्नागिरीकोकण भूमीत आढळणारे गरम पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी झाली. यात स्नान केल्याने त्वचारोग बरे होणे अथवा पाप नष्ट होते अशी लोकांची श्रद्धा आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी या स्थळी मंदिराची उभारणी झाल्याचे दिसते. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आरवली, राजवाडी, तुरळ, उन्हाळे याठिकाणी अशा प्रकारचे गरम पाण्याचे झरे आहेत. आजच्या युगातही मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक येथे भेट देऊन, स्नानाचा आनंद लुटतात.सन १६६८ यावर्षी राजापुरात फ्रेंच वखार स्थापन झाली. डेलाॅन नावाचा फ्रेंच प्रवासी सन १६७० मध्ये राजापुरात आला होता. तो आपल्या प्रवास वृत्तात म्हणतो, ‘‘फ्रेंचांनी नुकतीच येथे वखार घातली असून, जवळच एक सुंदर घर बांधले आहे. तेथे मोठ्या कारंजाशेजारी मोठी बाग आहे. त्या कारंज्यातून गरम पाण्याचा झरा वाहतो. युरोपातील कुठल्याही कारंजापेक्षा तो कमी प्रतीचा नाही.’’ यात डेलाॅनने उल्लेखिला गरम पाण्याचा झरा ‘उन्हाळे’ येथील आहे. अर्जुना नदीच्या मुख्य प्रवाहातिरी, फ्रेंचांची वखार होती. परंतु, सध्या ती पूर्णपणे नष्ट झाली असून, तिचे काहीच अवशेष शिल्लक नाहीत.दुसरी नोंद ‘बार्थलेमी ॲबे कॅरे’ या फ्रेंच प्रवाशाने आपल्या ‘The Travel Of In India And The Near East १६७२ To १६७४’ म्हणजे ‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ या ग्रंथात नोंदवली आहे. सुरत ते गोवा असा कॅरेचा प्रवास, बहुतांशी हिंदवी स्वराज्याच्या मुलूखातून झाला. त्याच्याजवळ मराठ्यांची दस्तके म्हणजे परवाना असल्याने, मार्गात कुठेच अडचण भासली नाही. तो लिहितो, ‘‘१३ डिसेंबर १६७२ रोजी दुपारी, आम्ही एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. येथे लोकांची गर्दी असून, यात स्त्रियाही होत्या, माझ्या एका सहकाऱ्याने सांगितलं की, हे एक हिंदूंचे पवित्र धार्मिक क्षेत्र आहे. याठिकाणी असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी अनेक भाविक येत असतात. यात स्नान केल्याने, सर्व पाप आणि असाध्य आजार बरे होतात. माझ्या सोबत असलेले मजूर व भोई श्रद्धाळू होते. त्यांनाही तेथे स्थान करण्याची इच्छा झाल्याने, मी त्यांना तशी परवानगी दिली. याठिकाणी पाण्याची दोन कुंडे असून, एकातील पाणी उकळल्यासारख गरम होत, तर दुसऱ्यातील पाणी अगदीच थंड आहे.’’वर उल्लेख केलेला गरम पाण्याचा झरा, संगमेश्वर जवळ असल्याचे ॲबे कॅरे सांगतो. संगमेश्वरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर, राजवाडी गावाजवळील रामेश्वर मंदिराजवळ गरम पाण्याचा झरा आहे. या मंदिराचे बांधकाम व रचना पाहता, सुमारे तीन शतकापूर्वी याची निर्मिती झाल्याचे अनुमान होते. तसेच तुरळ गावाजवळ अजून एक गरम पाण्याचा झरा असून, लगतच हेमाडपंथी रचनेचे एक प्राचीन शिवमंदिर, सध्याही पडझड झालेल्या अवस्थेत आहे. कॅरेने आपल्या प्रवास वृत्तात वर्णीत केलेला गरम पाण्याचा झरा, वर सांगितलेल्या दोन ठिकाणातील एक असावा असे वाटते.

  • गरम पाण्याच्या झऱ्या संदर्भात, ऐतद्देशीय साधनात जास्त उल्लेख सापडत नाही, परंतु काही परकीय प्रवाशांच्या, भारतातील प्रवास वर्णनात अशी नोंद आढळते.
  • शिवकालात कोकणातील सागरी व्यापार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया होता. परकीय सत्तांनी समुद्रकिनारी व अंतर्गत भागात खाडीवर आपली व्यापारी केंद्रे म्हणजेच ‘वखारी’ उघडल्या.
  • याचे प्रमुख कारण म्हणजे सुरतेपेक्षा, कोकणातील बंदरात माल स्वस्त मिळत असे. हे परकीय प्रवासी आपल्या सोबत वखारींची पत्रेही ने-आण करीत, त्यामुळे त्यांचा मुक्काम वखारीत होई. अशाच काही फ्रेंच प्रवाशांनी आपल्या कोकण प्रवासात गरम पाण्याच्या झऱ्याविषयी लिहून ठेवले आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी