शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातली कासवं गेली अरबी समुद्राच्या सफारीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:05 IST

कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांना ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांना ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. हा अभ्यास प्रकल्प  राज्य वनविभागाचा कांदळवन कक्ष आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’मार्फत (डब्ल्यूआयआय) राबविण्यात आला आहे. सध्या या मादी कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे.दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावण्याचा निर्णय ‘मँग्रोव्ह फाउंडेशन’ने घेतला. याअंतर्गत पाच मादी कासवांना ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावण्यात आले.

मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाला डब्ल्यूआयआयचे शास्त्रज्ञ डाॅ. आर. सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनांतर्गत ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावण्यात आले.  तिचे नाव ‘प्रथमा’ ठेवण्यात आले.दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ मादी कासवाला ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावण्यात आले. तिचे नामकरण ‘सावनी’ असे करण्यात आले. रेवा आणि वनश्री यांना फेब्रुवारी महिन्यात गुहागर येथून सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडले गेले.

त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास केला जात असून गुहागर येथून सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडल्यानंतर रेवाने दक्षिणेकडे एका सरळ रेषेत प्रवास सुरू केला आहे. ती पुन्हा कधीच राज्याच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली नाही. गेल्या दोन महिन्यात ती कर्नाटकातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचली आणि आता तिथून अरबी महासागरात खोल समुद्राकडे जाऊ लागली आहे.

रेवा पोहोचली दीवलागेल्या महिनाभरापासून गुजरात राज्यातील खोल समुद्रात राहणारी प्रथमा ही पहिली ऑलिव्ह रिडले आता दीवच्या किनारपट्टीभागाच्या जवळ आढळून येत आहे. प्रथमाने उत्तरेकडील आगेकूच थांबवली असून आती ती दक्षिणेकडे परत येत असल्याचे नुकत्याच केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. वनश्री आणि सावनी ही दोन कासवे सातत्याने दक्षिणेतील समुद्रातच वाटचाल करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग