शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहलीस गेलेला कोल्हापुरातील उचगावचा विद्यार्थी रत्नागिरीच्या समुद्रात बुडाला, स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:57 IST

कोल्हापूर उचगाव येथील एका शाळेची सहल कोकणात आली होती.

रत्नागिरी : कोल्हापूर उचगाव येथून सहलीसाठी रत्नागिरीत आलेल्या १०० मुलांच्या ग्रुपमधील १३ वर्षीय मुलगा रत्नागिरी शहरानजीकच्या आरे-वारे समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. आदित्य अरुण मंचावकर असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करून कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.कोल्हापूर उचगाव येथील एका शाळेची सहल कोकणात आली होती. ही सहल आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली होती. तेथून बुधवारी शिक्षक १०० मुलांना घेऊन रत्नागिरीत आले होते. रत्नागिरीत रत्नदुर्ग किल्ला पाहून गणपतीपुळेकडे निघाले होते. दुपारी एक वाजता सर्वजण आरे वारे समुद्रकिनारी पोहोचले. तेथे गेल्यानंतर मुले मौजमजा करण्यासाठी आरेवारे समुद्रात उतरली होती.बराच वेळ मजा मस्ती सुरू असताना अचानक आदित्य अरुण मंचावकर हा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात ओढला जाऊ लागला. त्यानंतर सोबत असलेल्या मुलांसह शिक्षकांनी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यातील काही ग्रामस्थांनी समुद्रात जाऊन आदित्यला बाहेर काढले. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य मूळचा कोल्हापूर येथे असल्याने रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे