शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Ratnagiri: बंदी उठून महिना लोटला; मासेमारीची जाळी रिकामीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:07 IST

आर्थिक तंगीमुळे कुणाकडे खलाशी, नौका दुरुस्त नाहीत

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर मासेमारी सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप पूर्ण मासेमारी सुरू झालेली नाही. आगावू रकमा देऊन खलाशी आणणे अनेक मच्छीमारांना शक्य झालेले नाही. मासेमारीपूर्वी नौकांची देखभाल दुरुस्ती करणारी कारागीर मंडळी मिरकरवाडा बंदर सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील बंदरांवर कामांसाठी गेल्याने अनेक नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यातच कमी प्रमाणात मिळणारी मासळी आणि वाढलेले खर्च यामुळे ५० ते ६० टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत.मासळीचे प्रमाण कमी?पावसाळी मासेमारी बंदी १ ऑगस्टला संपली आणि मासेमारी सुरू झाली. मात्र महिना झाला तरी रत्नागिरीतील सर्व नौका मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत. ज्या नौका मासेमारीसाठी जात आहेत, त्यांनाही फारशी मासळी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही काही नौकामालकांनी समुद्रात न जाणेच पसंत केले आहे. जे मासेमारीसाठी जात आहेत, त्यातील १० ते १२ टक्के लोकांनाच मासळी मिळत आहे. बाकी नौकांची स्थिती बिकट झाली आहे.

खलाशी आणायला पैसे नाहीत१ ऑगस्टपासून नियमित मासेमारी आणि १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली आहे. त्यांच्या नौका मोठ्या असल्याने त्यावर अधिक खलाशी असतात. स्थानिक पातळीवर खलाशी मिळत नसल्याने ते परप्रांतातून आणावे लागतात. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी आगावू रकमा देऊन त्यांना आणले जाते. मागील मासेमारी हंगाम बहुसंख्य मच्छीमारांसाठी तोट्याचा गेला. त्यामुळे नव्या हंगामासाठी खलाशांना आगावू देण्यासाठीची रक्कम नौकामालकांकडे नाही. खलाशी उपलब्ध नाहीत म्हणूनही काही नौका मासेमारीसाठी गेलेल्या नाहीत.

कारागीरही गेले सोडूनरत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणारे कारागीर येथे पुरेसे काम नसल्याने जिल्ह्याबाहेरच्या बंदरांवर कामे मिळतील, या आशेने गेले आहेत. यामध्ये जाळी विणणे, जाळी शिवणे, नौकांच्या फळ्या बदलणे, इंजिन दुरुस्त करणे आदी कामांचा समावेश आहे. हे कारागीर जिल्ह्याबाहेर गेल्याने अनेक नौकांची दुरुस्ती झालेली नाही. या नौकासुद्धा मिरकरवाडा व अन्य बंदरातच उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याचे दिसून येत नाही.

पाऊस नसल्याने..

दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या तारखेला पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते तेव्हा वारा, पाऊस असतो. या वातावरणामुळे दूरवरच्या खोल समुद्रातील मासे किनाऱ्याच्या जवळपास येतात. त्यामुळे काही प्रमाणात मासळी जाळ्यात सापडते. परंतु यावर्षी पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन तीन दिवस झाले तरी वारा, पाऊस नसल्याने अपेक्षित मासळी मिळू लागली नसल्याचे सांगण्यात आले.डिझेलसाठीही पैसे अपुरेपर्ससीन नेटचा वापर करणारे मच्छीमार आठवडाभराचे डिझेलसोबत घेऊन समुद्रात जातात. त्याच्या अनुदानाचा परतावा त्यांना सरकारकडून मिळतो. पण सध्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक मच्छीमार चार-पाच दिवसांचाच डिझेल साठा घेऊन समुद्रात जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार