शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: देव्हारेत फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान, बघ्यांची मोठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 16:00 IST

बचाव पथकाने लोखंडी पिंजरा लावून फासकीत अडकलेल्या बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले.

मंडणगड : तालुक्यातील देव्हारे आतले मार्गावर फासकीत अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने जीवनदान दिले. बुधवार २८ सायंकाळी हा प्रकार घडला.२८ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता मंडणगडचे वनपाल अनिल दळवी यांना देव्हारे येथील ग्रामस्थ श्रीधर खैर यांनी देव्हारे आतले रस्त्यालगत काजू बागायतीमध्ये फासकीत बिबट्या अडकला असल्याची माहिती दिली. त्यामुळे वनपाल मंडणगड व वनरक्षक देव्हारे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा बिबट्या दोन ते वर्षाचा नर जातीचा होता.दळवी यांनी याबाबत परिक्षेत्र वनअधिकारी दापोली वैभव बोराटे तसेच वनपाल दापोली, वनपाल खेड यांना याबाबत सूचित केले. खेडचे वनपाल तत्काळ लोखंडी पिंजरा व वन्यप्राणी बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखले झाले. वन्यप्राणी बचाव पथकाने लोखंडी पिंजरा लावून फासकीत अडकलेल्या बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर पिंजऱ्यासह बिबट्यास मंडणगड येथे आणून पशुधन विकास अधिकारी मंडणगड यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली.या प्रकरणी वनपाल मंडणगड यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याचा पुढील तपास दापोलीचे परिक्षेत्र वनअधिकारी बोराटे करीत आहे. या कारवाईत विभागीय वनअधिकारी रत्नागिरी दीपक खाडे, सहाय्यक वनरक्षक रत्नागिरी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनअधिकारी  बोराटे, मंडणगडचे वनपाल अनिल दळवी, खेडचे वनपाल सुरेश उपरे, दापोलीचे वनपाल सावंत तसेच देव्हारे व पालघरचे वनरक्षक सहभागी झाले होते.

फासकीत बिबट्या अडकला असल्याचे वृत्त तालुक्यात वाऱ्यासारखे पसरले. यामुळे असंख्य बघ्यांनी देव्हारे परिसरात एकच गर्दी केली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग