शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोकणी माणसाला वापरून घेणार नाही, काम देणार; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला

By मनोज मुळ्ये | Updated: November 30, 2023 17:18 IST

..त्यांचा आम्ही कधीही विश्वासघात करणार नाही

रत्नागिरी : कोकणी माणसाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम केले. शिवसेनेवर प्रेम केले. पण, शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले? विकासाचे प्रकल्प आल्यावर विरोध केला जातो. ज्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले, ज्यांनी शिवसेनेवर प्रेम केले, त्यांचा आम्ही कधीही विश्वासघात करणार नाही. त्याची फसगत करणार नाही. त्याला वापरून घेणार नाही. त्याच्या हाताला काम देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.रत्नागिरी दाैऱ्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, कोकणाचा विकास झाला तर येथील तरुण मुलांना आपले घर सोडून बाहेर जावे लागणार नाही. म्हणूनच आपण छोटे-छोटे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. मुंबई - गोवा हा ग्रीनफील्ड महामार्ग आपण करीत आहोत. एमएमआरडीएप्रमाणे कोकणासाठी स्वतंत्र रस्ते विकास प्राधिकरणही आपण पूर्णत्वाला नेत आहोत.कोकणचा विकास हा सरकारचा ध्यास आहे. म्हणून कोकणात अधिकाधिक उद्योग आले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात रोजगार मिळायला हवेत. त्याची सुरुवात आता झाली आहे. रस्त्यासह मूलभूत सुविधाही कोकणाला दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.कोकणी माणसाला वापरून घेणार नाही, या आपल्या विधानावर ते म्हणाले की, कोकणी माणसाने शिवसेनेवर प्रेम केले. म्हणूनच आम्ही केवळ त्याला वापरून घेणार नाही. त्याचा विश्वासघात करणार नाही. छोट्या-छोट्या उद्योगांमधून त्याच्या हाताला काम देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे