शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: खडपोलीत पती-पत्नीच्या वादातून हाणामारीपर्यंत जुंपली; पाच जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:29 IST

चिपळूण : पती-पत्नीच्या किरकोळ वादातून मारहाणीचा प्रकार खडपोली ब्राम्हणवाडी येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडला. पत्नीला पतीसह त्याच्या नातेवाइकांनी ...

चिपळूण : पती-पत्नीच्या किरकोळ वादातून मारहाणीचा प्रकार खडपोली ब्राम्हणवाडी येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडला. पत्नीला पतीसह त्याच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्याने येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फिर्यादी महिलेला दुखापत झाली आहे.वैभव पांडुरंग तांबट, विनोद पांडुरंग तांबट, विशाखा विनोद तांबट, रोहिणी रवींद्र पंडव ( सर्व रा. खडपोली ब्राह्मणवाडी ) व श्रद्धा गणेश गांजेकर (रा. कादवड, चिपळूण ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.यातील फिर्यादी महिला व वैभव पांडुरंग तांबट यांचे १८ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरु आहे. फिर्यादी यांनी घटस्फोट मिळण्यासाठी साडेतीन वर्षांपूर्वी खेड न्यायालयात दावा दाखल केला होता. फिर्यादी या आशा सेविका असून त्यांची बचत गटाची बैठक सोमवारी खडपोली ब्राह्मणवाडी येथे होती. फिर्यादी या बैठकीसाठी गेलेल्या असताना त्यांच्या समोरून एक रिक्षा गेली. त्या रिक्षात वैभव तांबट व त्याच्यासोबत एक महिला होती. त्यांना पाहून फिर्यादीने त्या रिक्षाच्या पाठीमागून गेल्याने तेथे फिर्यादी व वैभव तांबट यांच्यात वाद झाला. त्यानंतर वैभवने शिवीगाळ, दमदाटी करुन फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करुन ढकलून दिले. त्यानंतर जवळच असलेल्या विनोद तांबट यांना बोलाविले. विनोद तांबट याने हातातील काठीने फिर्यादी महिलेला मारले आणि शिवीगाळ केली. तसेच विशाखा तांबट, रोहिणी पंडव व श्रद्धा गांजेकर यांनीही फिर्यादीला मारहाण केली, अशी नोंद पोलिस तक्रारीत करण्यात आली आहे.याप्रकरणी या पाचही जणांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १८९ (२), १९०, ११५ (२), ११८ (२), ३५१ (२) व ३५२ नुसार अलोर- शिरगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Spousal dispute escalates to assault; case filed against five.

Web Summary : A domestic dispute in Ratnagiri's Khadpoli escalated into a violent assault. A woman was allegedly beaten by her husband and his relatives following a heated argument related to their ongoing divorce proceedings. Police have registered a case against five individuals involved in the incident.