खेड : तालुक्यातील कळंबणी येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला येथील न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. खेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी झाली. त्यांनी आरोपी अकबर अबू शेख याला एक वर्ष कारावास आणि ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.दि. ११ मार्च २०२५ रोजी कळंबणी येथे आपेडे फाटा येथील एका बांधकामाच्या साईटवर अकबर अबू शेख हा संशयास्पद परिस्थितीत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो वैध कागदपत्रांशिवाय आणि भारतीय प्रवेशासाठी आवश्यक पारपत्राशिवाय वास्तव्य करत असल्याचे समोर आले.या प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाचे हवालदार आशिष वसंत शेलार यांनी फिर्याद दिली. गुन्हा भारतीय परकीय नागरिक कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला होता. खेड न्यायालयात हा खटला चालला. सरकारी पक्षाची बाजू ॲड. विद्या गायकवाड यांनी मांडली. तपास पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी केला, तर प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विवेक अहिरे होते. न्यायालयीन पैरवी हवालदार गायकवाड यांनी केली. सर्व पुरावे आणि साक्षीचा विचार करून, न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.
Web Summary : A Bangladeshi national, Akbar Abu Sheikh, was sentenced in Khed, Ratnagiri, to one year in jail and a ₹500 fine for illegally residing in Kalambani. He was found without valid documents on March 11, 2025, and booked under the Foreigners Act. The court found him guilty based on evidence presented.
Web Summary : रत्नागिरी के खेड़ में अवैध रूप से रह रहे अकबर अबू शेख नामक एक बांग्लादेशी नागरिक को एक साल की जेल और ₹500 का जुर्माना लगाया गया। वह 11 मार्च, 2025 को वैध दस्तावेजों के बिना पाया गया था और विदेशी अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया था। अदालत ने सबूतों के आधार पर उसे दोषी पाया।