शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाचे ४ लाख वसूल; चिपळुणात सावकारीप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल

By संदीप बांद्रे | Updated: January 2, 2024 15:52 IST

चिपळूण : दोन दिवसांपूर्वी एका महिलेला सावकारांनी 90 हजार रूपयांच्या कर्जापोटी तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची लूट सावकारांनी ...

चिपळूण : दोन दिवसांपूर्वी एका महिलेला सावकारांनी 90 हजार रूपयांच्या कर्जापोटी तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची लूट सावकारांनी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. ही घटना ताजी असतानाच अनधिकृत सावकारीचा आणखी एक गुन्हा उघड झाला असून याप्रकरणी चिपळूणातील दोघांविरुद्ध दाखल झाला आहे. गरजेसाठी एक लाख रुपये घेतलेल्या व्यक्तीकडून अनधिकृत सावकारी करणाऱ्याने तब्बल चार लाख २५ हजार इतकी मोठी रक्कम वसूल केली. सावकाराच्या या जाचाला कंटाळून संबंधित व्यक्तीने चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर सावकारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी फिरोज म्हैसकर, रोहित नारकर (दोघेही रा. चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. पोसरे येथील सुशांत मोहिते यांनी यासंदर्भात चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीनूसार २२ डिसेंबर २०२२ ते २१ जुलै २०२३ रोजी या कालावधीत हा प्रकार घडला आहे. संशयित आरोपी फिरोज म्हैसकर हा गेली काही महिने पोसरे परिसरात सावकारी धंदा करीत होता. तो गरजू लोकांकडून पठाणी व्याजाप्रमाणे व्याज वसूल करत होता. मोहिते याने त्याच्याकडून पत्नीला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करताना एक लाख रुपये कर्ज म्हणून घेतले होते. त्या बदल्यात त्याने मोहिते या्च्याकडून तब्बल ४ लाख २५ हजार रुपये वसूल केले. पैसे देण्यास उशिर झाला म्हणून म्हैसकर आणि रोहित नारकर हे दोघे एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी मोहिते याला शिवीगाळ, दमदाटी करत होते. त्याच्या घरी जाऊन पैशासाठी तगादा लावत होते. दोघांच्या जाचाला कंटाळून मोहिते यांनी चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हैसकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांवर भा.दं.वि. कलम ४२०, ४०, ३८४, ५०४, ५०६, ३४, महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ चे कलम ३९, ४८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारी