शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

रत्नागिरीत ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय होणार, सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला मोठा निर्णय

By मनोज मुळ्ये | Updated: February 12, 2024 17:21 IST

रत्नागिरी : राज्यात १३ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर सुरू असल्याने या १३ ठिकाणी ५०० खाटांचे जिल्हा ...

रत्नागिरी : राज्यात १३ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर सुरू असल्याने या १३ ठिकाणी ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यात रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव सरकारला दिला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यासाठी राज्यात १३ ठिकाणी जिल्हा रुग्णालये ताब्यात घेण्यात आली आहेत. या १३ ठिकाणी ५०० बेड्सची नवीन जिल्हा रुग्णालये सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला आहे.

यासाठी ७,८०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी यावर्षी १,३०० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी रुग्णालय ही सर्वात पहिली महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगीसाठी अर्ज करताना जिल्हा रुग्णालये त्यात दाखवली होती. सध्या ज्या जिल्ह्यातील रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी घेण्यात आली, त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये नाहीत.त्यामुळे तेथे आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यावर मात करण्यासाठी नवी जिल्हा रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कळवा आणि नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयासारख्या घटना टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर सविस्तर चर्चाही झाली आहे.

जिल्ह्यातील बहुसंख्य सर्वसामान्य लोकांना जिल्हा रुग्णालयाचाच आधार असतो. इतर तालुक्यात अत्यवस्थ झालेल्या रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयात आणले जाते. सर्वसामान्य लोकांसाठी ही व्यवस्था अत्यंत महत्त्चाची आणि गरजेची आहे. त्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या ठिकाणी होणारे रुग्णालये

वैद्यकीय शिक्षण विभागाने १३ जिल्हा रुग्णालये स्वतःकडे घेतली आहेत. त्यामध्ये रत्नागिरीसह अलिबाग (रायगड), बारामती (पुणे), सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, धाराशिव, गोंदिया, चंद्रपूर, नंदुरबार आणि जळगाव येथील जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल