शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील ९० डाॅक्टरांना चार महिने वेतनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:22 IST

रत्नागिरी :  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देणाऱ्या तदर्थ वैद्यकीय अधिकारी ऑक्टाेबर २०२२ पासून मानधनाविना काम करत आहेत. ...

रत्नागिरी :  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देणाऱ्या तदर्थ वैद्यकीय अधिकारी ऑक्टाेबर २०२२ पासून मानधनाविना काम करत आहेत. वेतनासाठीचे अनुदान न आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. अनेक महिने सेवा बजावूनही अद्याप मानधन न मिळाल्याने जिल्ह्यातील ९० तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता वेतन वेतन करण्याची वेळ आली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर एमबीबीएस पदवीधर  उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधर नियुक्त करण्यात आले आहेत.  शासन निर्णयानुसार सप्टेंबर २०१९पासून जिल्ह्यामध्ये ९०  तदर्थ वैद्यकीय अधिकारी काम करीत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा भार हा मोठ्या प्रमाणावर तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांच्यावर आहे. तदर्थ वैद्यकीय अधिकारी हे नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.काेविडच्या महामारीमध्ये सर्व तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली आहे. त्यामुळे त्यांचा ‘काेविड योध्दा’ म्हणून सन्मानही करण्यात आला होता. एवढी मोठी जबाबदारी पार पडत असतानाही त्यांना केवळ ४० हजार मानधनावर काम करावे लागत आहे.  तुटपुंजा  मानधनावर काम करताना त्यांना आर्थिक व पर्यायाने कौटुंबीक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे सर्वजण मानसिक व आर्थिक तणावाखाली काम करत आहेत.दरम्यान, त्यांची ११ महिन्यांची तात्पुरती नियुक्ती असल्याने नोकरी कधीही गमावण्याची कायम भीती आहे, तर गेली तीन वर्षे  प्रामाणिकपणे सेवा बजावत असूनही त्यांना कोणतीही वेतनवाढ अथवा भत्ता दिला जात नसल्याचे विदारक सत्य आहे. उलट कार्यक्षेत्रातील उपकेंद्र, लसीकरण केंद्र आदिंना वारंवार भेटी द्याव्या लागतात. त्यामुळे त्यांना किमान प्रवास भत्ता तरी मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. त्याकडेही शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. वेतनाचे अनुदान शासनाकडून अद्याप न आल्याने वेतनाचा प्रश्न अडकून पडला आहे.  दरम्यान, प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळेवर मानधन दिले जात नाही.  मागील चार महिन्यांपासून या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनच मिळालेले नाही. वेतन न मिळाल्याने या सर्वांची फरपट हाेत आहे.

जिल्ह्यातील तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनासाठी शासनाकडून अनुदानच आलेले नाही.  त्यांच्या मानधनासाठी लागणाऱ्या अनुदानाची रक्कम मिळावी, त्यासाठी प्रत्येक महिन्याला आमच्याकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. -  डॉ. अनिरूध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdoctorडॉक्टर