शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रत्नागिरीमध्ये एलईडीलाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या ९ बोटी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:52 IST

एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रत्नागिरी व जयगडच्या परिसरात आज कारवाई केली. या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री आढळून आलेल्या ९ आणि बेकायदेशीरपणे पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या २ अशा ११ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरीमध्ये एलईडीलाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या ९ बोटीवर कारवाई कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री जप्त

रत्नागिरी : एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रत्नागिरी व जयगडच्या परिसरात आज कारवाई केली. या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री आढळून आलेल्या ९ आणि बेकायदेशीरपणे पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या २ अशा ११ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.एलईडी लाईटद्वारे करण्यात येणारी मासेमारी ही मत्स्यसाठ्यावर अत्यंत घातक परिणाम करणारी आहे. केंद्र शासनाच्या १० नोव्हेंबर २०१७च्या आदेशानुसार एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

एलईडी लाईटच्या प्रकाशामुळे मासेमारी क्षेत्रातील सर्व मासे आकर्षित होऊन एकाच ठिकाणी जमा होतात. हा संपूर्ण साठा एकाच जाळ्याद्वारे पकडला जातो. त्यामुळे असे साठे संपत गेल्यास भविष्यात माशांचे उत्पादन कमी होऊन मत्स्यदुष्काळाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे एलईडी लाईटद्वारे होणाऱ्या मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्त घालण्यात येत आहे.रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गस्तीदरम्यान आढळून येणाऱ्या अवैध मासेमारीबाबत कारवाई करण्यासाठी तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) आणि पोलिसांना मत्स्यव्यवसाय विभागाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. रत्नागिरीचे मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त आ. बा. साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील परवाना अधिकाऱ्यांच्या पथकाच्या गस्तीदरम्यान अवैधरित्या मासेमारी होत असल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.मासेमारी नौंकाचे समुद्रातील नेमके ठिकाण आणि हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी व्हीटीएस बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या नौकांच्या मालक आणि चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत या नौकांना देण्यात आलेला परवाना रद्द करण्याचे आदेश रत्नागिरीच्या परवाना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकाउन्मे कुलसुंब (आयएनडी/एमएच/४/१५३६), खतीजा- सानिया (आयएनडी/एमएच/४/एमएम/१५२५), सुफीया आयशा (आयएनडी/एमएच/४/एमएम/१४७०), सुलतान जमान (आयएनडी/एमएच/४/एमएम/६३२), एम साहील एम राहील (आयएनडी/एमएच/४/एमएम/३३९०), श्री विघ्नहर्ता गजानन (आयएनडी/एमएच/१/एमएम/६५७), अमिना अजीजा (आयएनडी/एमएच/४/एमएम/१२३९), सईम महम्मद रजीन (आयएनडी/एमएच/४/एमएम/१७४६), काळबादेवी एक (आयएनडी/एमएच/५/एमएम/३२९१) या नौकांवर जनरेटर आणि एलईडी साधनसामुग्री आढळून आली. या नौका जनरेटर आणि एलईडी साधनसामुग्रीसह जप्त करण्यात आल्या आहेत.पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकाखलाखी (आयएनडी/एमएच/४/एमएम/१५६५) ही व्हीटीएस (व्हेसल ट्रॅकींग सिस्टीम) यंत्रणा नसलेली बोट आणि जरिमरी तिसाई (आयएनडी/एमएच/१/एमएम/३२३७) ही परवाना तसेच मालकीबाबतचा योग्य पुरावा नसलेली नौका पर्ससीन जाळ्याने मासेमारी करत असताना आढळून आल्याने जप्त करण्यात आली.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी