शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गावखडी किनारी ८२ कासवांच्या पिलांची समुद्राकडे झेप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 16:57 IST

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवाच्या घरट्यातून सोमवारी (२० ...

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवाच्या घरट्यातून सोमवारी (२० मार्च) ८२ पिले बाहेर येत समुद्रात झेपावली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पिले समुद्रात सोडण्यात आली.लांबलेला पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे यावर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या विणीचा हंगाम काहीसा लांबला हाेता. त्यातूनही जिल्ह्यातील समुद्र किनारी कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. गावखडी येथे कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी कासवांची घरटी संरक्षित केली आहेत. काही दिवसांपूर्वी मंडणगड तालुक्यातील वेळास याठिकाणी ९ कासवे समुद्रात साेडण्यात आली हाेती. त्यानंतर आता गावखडी येथे ८२ कासवांची पिल्ले समुद्रात साेडण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी स्मिता पाटील, रत्नागिरी प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्रपाल प्रियंका लगड आणि कर्मचारी उपस्थित हाेते. तसेच रत्नागिरीतील कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई यांचे कर्मचारी, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे नीलेश बापट, गावखडी ग्रामपंचायतीचे सरपंच  मुरलीधर तोडणकर, कांदळवन सहव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कांचन आंब्रे तसेच पर्यटक, निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गावखडी समुद्र किनाऱ्यावर कांदळवन प्रतिष्ठान, मुंबईतर्फे कांदळवन व गावातील जैवविविधतेबाबत माहिती फलक लावण्यात आले आहेत. या फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याहस्ते करण्यात आले. कांदळवन कक्षातर्फे गावात जनजागृतीही करण्यात येत आहे. त्याद्वारे कांदळवन संरक्षण आणि कासवांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासवाने घरटे बनविल्यानंतर साधारण ५० ते ६० दिवसांनंतर पिले घरट्यातून बाहेर येण्यास सुरुवात होते. यावर्षी विणीचा हंगाम काहीसा लांबला असून, पिले बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यापर्यंत या अंड्यांमधून पिले समुद्रात झेपावतील. - प्रदीप डिंगणकर, कासवमित्र, गावखडी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी