शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सह्याद्री खाेऱ्यातील घरे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 19:02 IST

आमच्या आयुष्यातील हा सोन्याचा दिवस आहे,’ अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या

पाचल : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सह्याद्रीच्या खाेऱ्यातील कार्जिडा (ता. राजापूर) गावातील ब्राह्मण देव खोरे येथील सहा घरांना महावितरणने वीज देऊन त्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. तब्ब्ल ७५ वर्षांनंतर घरात वीज आल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत दिवाळीच साजरी केली. डोंगरदऱ्यात अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या घरांना वीज पुरवठा करणाऱ्या पाचल महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता संदीप बंडगर यांचेही ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले. काजिर्डा गावात काही वर्षांपूर्वीच वीज आलेली आहे. मात्र, गावापासून पाच ते सहा किलाेमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात ब्राह्मण देव खोरे हा भाग वसलेला आहे. अतिशय दुर्गम भाग असून, येथे सहा ते सात घरांची वस्ती आहे. गेले अनेक वर्षे हे ग्रामस्थ विजेपासून वंचित आहेत. घनदाट जंगल, रस्ता तसेच साधी पायवाटही नाही. अशा दुर्गम भागात वीजपुरवठा करण्याचे अनेकवेळा प्रयत्न निष्फळ ठरले.या दुर्गम भागातील घरांना वीजपुरवठा करणे महावितरणसमोर मोठे आव्हानच होते.  संदीप बंडगर यांनी या वस्तीचे तत्काळ सर्वेक्षण  करून प्रस्ताव सादर केला.१४ लाखांच्या या कामाला रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांनी मंजुरी दिली आणि कामही पूर्ण झाले. अखेर तब्बल ७५ वर्षांनंतर १ मे रोजी या घरात वीज आली आणि ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. या वस्तीला वीज पुरवठा करण्यासाठी गावातील ग्रामस्थ, जमीन मालक, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचेच सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने महावितरणने दुर्गम भागातील घरात वीज देऊन अनेक वर्षांची इच्छा पूर्ण केली.

...तुमच्यामुळेच घरी वीज आली‘साहेब आज तुमच्यामुळेच आमच्या घरी वीज आली. आज आमच्या आयुष्यातील हा सोन्याचा दिवस आहे,’ अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. कनिष्ठ अभियंता संदीप बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानताना ग्रामस्थांचे डाेळे पाणावले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीज