राजापूर : तालुक्यात काही दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसत असली, तरी नव्याने निष्पन्न होत असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. सोमवारी (दि. २४) ७५ नवे रुग्ण आढळले. यामध्ये आरटीपीसीआर तपासणीतील ६५, तर अँटिजेन तपासणीतील दहा रुग्णांचा समावेश आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या २०२५ झाली आहे. आता ६३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
अवघ्या काही दिवसांपूर्वी होम आयसोलेशनचा कालावधी संपुष्टात आल्याने तब्बल ५२५ बाधित रुग्णांचा समावेश कोरोनामुक्तांमध्ये झाला होता. मात्र, त्यानंतर प्रती दिन रुग्णसंख्येत वाढ होतानाच दिसत आहे. शुक्रवारी २१ मे रोजी ३५, शनिवारी २०, रविवारी ३६, तर सोमवारी नवे तब्बल ७५ रुग्ण निष्पन्न झाले. सोमवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता ७९ झाली आहे. तालुक्यात निष्पन्न झालेल्या कोरोना रुग्णसंख्येने दोन हजारी पार केलेली असताना बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३१२ एवढी आहे.