शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रत्नागिरी शहरातील महाविद्यालयाचे ७ शिक्षक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:15 IST

corona virus Ratnagirinews- रत्नागिरी शहरातील एका महाविद्यालयातील ७ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात आणखी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९८५६ इतकी झाली असून, मृतांचा आकडा ३६२वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी शहरातील महाविद्यालयाचे ७ शिक्षक पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेय, निष्काळजीपणाचा फटका

रत्नागिरी : शहरातील एका महाविद्यालयातील ७ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात आणखी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९८५६ इतकी झाली असून, मृतांचा आकडा ३६२वर पोहोचला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी शहरातील एका महाविद्यालयाचे शिक्षक हजर होण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. हजर होण्यापूर्वी त्यांची चाचणी केली असता ७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे शिक्षक कोठून आले होते, याचा शोध घेतला जाणार आहे. जिल्ह्यात २३४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असतानाच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीमध्ये २१ रुग्ण आणि ॲन्टिजेनमध्ये ६ रुग्ण आढळले.संगमेश्वर तालुक्यातील ५२ वर्षीय आणि दापोलीतील ७५ वर्षे वयाच्या अशा दोन महिला रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. दिवसभरात ७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत एकूण ९३१५ रुग्ण बरे झाले आहेत.रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक रुग्णपॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यात १५ रुग्ण, खेडमधील ६, चिपळुणातील ३, संगमेश्वरातील २ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. ३३ कोरोनाचे रुग्ण गृह अलगीकरणात असून १३२ रुग्ण जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताच कोरोना गेल्याचा समज करून नागरिक बेफिकीरपणे वागू लागले आहेत. नियमांचे पालन केले जात नसल्याने चिंता वाढली आहे.रुग्ण फिरला लग्नातजिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व्यक्तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य पथक घरी गेले असता ती व्यक्ती गावातील एका लग्न समारंभात फिरल्याची माहिती मिळाली. त्याच्याशी अनेकवेळा संपर्क करूनही त्याने फोन उचलला नाही. अखेर तेथील सरपंच, पोलीस पाटील यांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्या पॉझिटिव्ह व्यक्तिला लग्न मंडपातून बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी