शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात ६६६ विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 16:04 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या माध्यमिक शाळांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे प्रस्ताव आॅनलाईन भरलेले आहेत, त्याच्या पडताळणीची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ रोजी संपलेली आहे. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यातील नूतनीकरणाच्या एकूण ६६६ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी विहीत मुदतीत झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात ६६६ विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीविना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे प्रस्ताव आॅनलाईन

हातखंबा : जिल्ह्यातील ज्या माध्यमिक शाळांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे प्रस्ताव आॅनलाईन भरलेले आहेत, त्याच्या पडताळणीची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ रोजी संपलेली आहे. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यातील नूतनीकरणाच्या एकूण ६६६ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी विहीत मुदतीत झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे.केंद्र शासनाने ज्या नूतनीकरण विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी शाळा / संस्था तसेच जिल्हास्तरावर झालेली नव्हती, अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने १६ मे २०१८ पर्यंत पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत कळवलेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ६६६ नूतनीकरण विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ न शकल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी पडताळणीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

शाळा / संस्था स्तरावर नूतनीकरण विद्यार्थ्यांचे आॅनलाईन भरलेल्या अर्जांची पडताळणी विहीत मुदतीत करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. शाळा व संस्था स्तरावर शिल्लक असलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी कोणत्याही परिस्थितीत ११ मे, २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची आहे.

ही पडताळणी मुदतीत न केल्यास आणि विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याकरिता मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येईल.

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी