शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोकण कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:02 IST

राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकोकण कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण :चंद्रकांत पाटील राहुरीतील विद्यापीठाच्या धर्तीवर कोकणातील प्रकल्पग्रस्तांनाही न्याय देण्याची बैठकीत मागणी

रत्नागिरी : राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासंदर्भात मंत्रालयात बुधवारी बैठक झाली. या बैठकीला राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, उपसचिव गावडे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.महात्मा फुले विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के नोकऱ्या दिल्या जात आहेत. मात्र, कोकणामधील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न रखडला आहे. राहुरी येथील विद्यापीठाच्या धर्तीवर कोकणातील प्रकल्पग्रस्तांनाही न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली. त्यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित निर्णय न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी दोन कृषी विद्यापीठांना वेगवेगळा न्याय होऊ शकत नाही, असे म्हणत कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

या निर्देशांमुळे गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वेगाने मार्गी लागणार आहे. विद्यापीठातील शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येकडेही आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी कृषिमंत्र्यांनी सचिवांना तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यापीठात लवकरच जादा शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.आंबेनळी अपघातात मृत्युमुखी कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून नोकरी मिळाली नसल्याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.कुलगुरुपदासाठी शनिवारी मुलाखतकोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर लवकरात लवकर कुलगुरुंची निवड करण्याची मागणी आमदार डावखरे यांनी केली. त्यावेळी या पदांसाठी येत्या शनिवारी (ता. २३) मुलाखती होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर प्राधान्याने कुलगुरुपदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRatnagiriरत्नागिरी