शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

By मनोज मुळ्ये | Updated: October 19, 2023 14:12 IST

..त्यामुळे दहशतवाद्यांचे किती समर्थन करायचे, हे शरद पवारांना कळायला हवे

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीमध्ये केला.भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौर्यावर आले आहेत. बुधवारी रायगड मतदार संघातील दौरा करुन ते रात्री रत्नागिरीत दाखल झाले. गुरुवारी सकाळी त्यांनी भाजपच्या वॉरियर्सशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने गेल्या नऊ वर्षात देशात अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. देशाला जगात सर्वोत्तम करण्यासाठी गेल्या नऊ वर्षात त्यांनी प्रयत्न केला आहे, त्यामुळेच देशातील लोकांना ते पुन्हा पंतप्रधान व्हावेसे वाटतात. आपण आतापर्यंत ३२ हजाराहून अधिक लोकांना भेटलो. त्यातील फक्त १३ लोक सोडून बाकी सर्वांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. राज्यातील ९० टक्के लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीचा उमेदवार ५१ टक्के मते घेऊन विजयी होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले.प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ६० हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा म्हणजेच या मतदार संघातील साडेतुन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प वॉरियर्सच्या बैठकीत करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. मोदी यांच्या कार्यकाळातील योजना संपर्क ते समर्थन अशा अभियानातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. संपर्क करायचा आणि समर्थन मागायचे, अशी ही मोहीम आहे.शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेत पंतप्रधानांवर टीका केली आहे. मात्र दहशतवादी हल्ला काय असतो, हे शरद पवार यांना माहिती आहे. ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावरही दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे दहशतवाद्यांचे किती समर्थन करायचे, हे त्यांना कळायला हवे. त्यांनी पंतप्रधानांवर जी टीका केली आहे, त्याचा आपण निषेध करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlok sabhaलोकसभाBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे