रत्नागिरीत आढळले ४२३ कोरोनाचे नवे रुग्ण, १६ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:00+5:302021-07-03T04:21:00+5:30

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, दिवसभरात ४२३ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ६३,०३७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे १६ ...

423 new corona patients found in Ratnagiri, 16 patients die | रत्नागिरीत आढळले ४२३ कोरोनाचे नवे रुग्ण, १६ रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरीत आढळले ४२३ कोरोनाचे नवे रुग्ण, १६ रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, दिवसभरात ४२३ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ६३,०३७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या १,८०५ झाली आहे तर ३८८ रुग्णांनी कोराेनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ५५,१३० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी दर ७.८७ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात ४,६२३ जणांची कोरोना चाचणी झाली. त्यामध्ये ३६४ बाधित सापडले असून, मागील ५९ रुग्ण आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ५ रुग्ण, दापोलीत १३, खेडमध्ये २३, गुहागरात २८, चिपळुणात ९४, संगमेश्वरात ३७, रत्नागिरीत १११, लांजात १५ आणि राजापुरात ३८ रुग्ण सापडले. नऊ तालुक्यांमध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्हिटी दर १३.२० टक्के रत्नागिरी तालुक्याचा आहे तर सर्वात कमी पॉझिटिव्हिटी दर खेड तालुक्याचा ४.४७ टक्के आहे.

जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये २ आणि शासकीय रुग्णालयांमध्ये १४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ७ रुग्णांचा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी ३ रुग्णांचा तर चिपळूण, खेड, लांजा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर २.८६ टक्के असून, बरे होण्याचा दर ८७.६७ टक्के आहे. सध्या जिल्हाभरात ६,१०२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: 423 new corona patients found in Ratnagiri, 16 patients die