शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रत्नागिरीत करमणूक करापोटी वर्षभरात चार कोटीचा महसूल जमा

By admin | Updated: April 19, 2017 12:47 IST

कर रद्द केल्याचा फटका वसुलीला

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी,दि. १९ : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने यावर्षी ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती करून ३ कोटी ३९३ लाख इतका महसूल मिळवला आहे. संगणक, मोबाईल, विविध वाहिन्या यामुळे सध्या सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटावरील करमणूक कर रद्द केल्याने या विभागाची वसुली रोडावली आहे. जिल्हा करमणूक कर शाखेला सायबर कॅफे, व्हिडिओ खेळघर, सिनेमागृह, केबल्स आदींच्या माध्यमातून महसूल मिळतो. मात्र, संगणक, मोबाईलमुळे सायबर कॅफेची संख्या अतिशय कमी झालेली आहे. मोबाईलवर आता विविध खेळ उपलब्ध झाले असल्याने व्हिडिओ खेळघरही कालबाह्य होऊ लागले आहे. जिल्ह्यात चित्रपटगृहांची संख्याही केवळ पाच आहे. त्यामुळे यापासून मिळणारा करही कमी झाला आहे. त्यातच आता मराठी चित्रपटांवरील कर रद्द केल्याने तर इष्टांकपूर्ती होणे अवघड झाले आहे.या शाखेला २०१६ - १७ या आर्थिक वर्षाकरिता ४ कोटी १० लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९५.९२ टक्के इतकी उद्दिष्टपूर्ती केली आहे. सर्वाधिक वसुली लांजा तालुक्यात (११८ टक्के) झाली असून, त्याखालोखाल मंडणगड (१११ टक्के) आणि राजापूर तालुक्याने (१०० टक्के) केली आहे. सध्या डीटीएचधारकांची संख्या वाढती असल्याने डीटीएच करापोटी २ कोटी ६५ लाख ९१ हजार इतका महसूल गोळा झाला असून, यासाठी २ कोटी ६३ लाख रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावर्षी उद्दिष्टापेक्षा जास्त (१०१.११ टक्के) वसुली झाली आहे. (प्रतिनिधी)