शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीयोजना दुरुस्तीला ४ कोटींची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:50 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ नळपाणी योजना गेली काही वर्षे नादुरूस्त आहेत. या योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला ४ कोटी १२ लाख ७५ हजार रूपयांची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची प्रशासनाकडे मागणी, जिल्ह्यातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त.- हजारो लोकांना पाणीटंचाईचा बसतोय फटका,  जिल्हा प्रशासनाकडून दुरुस्तीचा प्रस्ताव.

रत्नागिरी : जिल्ह्यातील ६४ नळपाणी योजना गेली काही वर्षे नादुरूस्त आहेत. या योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला ४ कोटी १२ लाख ७५ हजार रूपयांची आवश्यकता आहे.जिल्हा परिषदेने ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे आजही लाखो लोकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांतील वाड्यांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झालेले आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. आता मात्र, नळपाणी योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात ही गैरसोय दूर करण्यात आली.

या नळपाणी योजनांच्या पाणीपट्टीच्या वसुलीतून जिल्हा परिषदेला कमी प्रमाणात महसूल मिळत असला तरी पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनांवरील खर्च पाणीपट्टी वसुलीपेक्षा जास्त असतो.नादुरूस्त झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रूपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत असले तरी ही दुरूस्ती वेळेवर होतेच नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड सुरु असते.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तालुक्यातून नादुरुस्त योजनांची माहिती मागविली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील ५३ गावातील ८५ वाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या शेकडो पाणी पुरवठ्याच्या योजना नादुरुस्त आहेत. त्यापैकी केवळ ६४ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करण्यात येणार असून, त्यांसाठी ४ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांची आवश्यकता भासणर आहे.या नादुरुस्त नळपाणी योजनांची दुरुस्ती झाल्यास टंचाईच्या कालावधीत येथील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला या योजनांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांची आवश्यकता असून जिल्हा प्रशासनाकडे तशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी