पालिकांसाठी ३८४ उमेदवार रिंगणात

By admin | Published: November 11, 2016 11:57 PM2016-11-11T23:57:38+5:302016-11-11T23:57:38+5:30

नगराध्यक्षपदासाठी १८ जण : जिल्ह्यात १०७ जागांसाठी निवडणूक

384 candidates in the fray for the candidates | पालिकांसाठी ३८४ उमेदवार रिंगणात

पालिकांसाठी ३८४ उमेदवार रिंगणात

Next

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि दापोली नगरपंचायतीची निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर आज चार ठिकाणच्या नगराध्यक्ष पदासाठी १८ तर पाच ठिकाणी मिळून नगरसेवकांच्या १०७ जागांसाठी ३८४ उमेदवार रिंगणात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगर परिषदांची आणि दापोली नगर पंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी अर्ज मागे घेण्याची आज शुक्रवारी अंतिम मुदत होती. रत्नागिरीमध्ये नगरसेवकांच्या ३0 जागांसाठी १०६ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ७ जणांनी आत्तापर्यंत अर्ज मागे घेतल्याने आता ९९ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ९ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने सहा उमेदवार रिंगणात आहेत.
चिपळूणमध्ये नगरसेवकांच्या २६ जागांसाठी ११३ अर्ज आले होते. त्यापैकी सहा जणांनी अर्ज मागे घेतल्याने १०७ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी वैध ठरलेल्या ५ उमेदवारांपैकी कुणीही माघार घेतलेली नाही.
खेडमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६२ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ४ अर्ज मागे घेण्यात आल्याने ५८ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी वैध ठरलेल्या ६ उमेदवारांपैकी २ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
राजापुरात १७ नगरसेवकांच्या जागांसाठी वैध ठरलेल्या ६९ अर्जांपैकी १४ अर्ज मागे घेण्यात आल्याने आता ५५ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, नगराध्यक्षाच्या जागेसाठी वैध ठरलेल्या तीन उमेदवारांपैकी कुणीही अर्ज मागे घेतलेली नाही.
दापोली नगर पंचायतीमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी वैध ठरलेल्या ८४ उमेदवारांचे १०७ अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी राहिले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुरंगी, तर नगरसेवक पदासाठी चौरंगी व बहुरंगी लढती होणार आहेत. पक्षातून बंडखोरी केलेल्या उमेदवारांचे बंडाचे निशाण थंड करण्यास अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सर्वच पक्षात झालेली बंडखोरी व अपक्षांचे आव्हान युती-आघाडीसमोर उभे ठाकले आहे.
सावंतवाडी पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण १0 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नगराध्यक्ष पदासाठी सहा, तर नगरसेवक पदासाठी ६७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुरंगी, तर नगरसेवक पदासाठी तिरंगी लढती होणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी विरोधात शिवसेना आणि भाजप स्वतंत्ररीत्या लढणार आहे.
देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ९ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १७ नगरसेवक पदासाठी ५७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिहेरी लढत येथे होणार असून प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेना-भाजप यांचे स्वतंत्ररीत्या उमेदवार असल्याने या एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. (प्रतिनिधी)
सर्वांनाच बंडखोरीची लागण
काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्वच पक्षांना कमी अधिक प्रमाणात बंडखोरीची लागण लागली आहे. शिवसेना आणि काँग्रेसने काही प्रमाणात बंडखोरांना शांत केले असले तरी अजूनही बरेच बंडखोर रिंगणात असल्याने सर्वच ठिकाणच्या लढती अत्यंत लक्षवेधी होणार आहेत.

बसपचा उमेदवारी अर्ज वैध
रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदासाठी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार म्हणून सलमा काझी यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र तांत्रीक कारणाने हा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. शुक्रवारी त्यावर सुनावणी झाली. तांत्रीक चूक अमान्य करीत न्यायालयाने सलमा काझी यांचा अर्ज वैद्य ठरविला आहे. त्यामुळे रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणूक रिंगणातील
उमेदवारांची संख्या आता ५ ऐवजी ६ झाली आहे.

नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या
नगर परिषदनगराध्यक्षनगरसेवक
रत्नागिरी०६०९९
चिपळूण०५१०७
खेड ०४०५८
राजापूर ०३०५५
दापोली-०६५
एकूण१८३८४

Web Title: 384 candidates in the fray for the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.