शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान

By मेहरून नाकाडे | Updated: April 28, 2023 19:32 IST

११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ११ हजार ११० मतदारांपैकी ३ हजार ४१५ मतदारांनी मतदान केले असून एकूण ३२.३७ टक्के मतदान झाले आहे. शनिवार दि.२९ एप्रिल रोजी निकाल असल्याने संचालकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान झाले. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली, सकाळी दहा वाजेपर्यंत ४०५, दुपारी १२ वाजेपर्यंत ८२० तर दुपारी ३ वाजेपर्यंत २ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सायंकाळी ५ वाजेपर्यंत ११ हजार ११० पैकी मतदारांपैकी ३ हजार ४१५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानापैकी ३२.३७ टक्के मतदान झाल्याचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून एक हजार ६२१ तर ग्रामपंचायत मतदार संघातून एक हजार ७९४ मतदारांनी मतदान केले.बाजार समितीसाठी सहकार पॅनेलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र तीन अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक घ्यावी लागली. सहकार पॅनेलचे हेमचंद्र माने, गजानन पाटील, सुरेश कांबळे हे तीन संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.सहकार पॅनेलमधून ठाकरे सेना, शिंदे गट यांना प्रत्येकी ४, भाजपा, काँग्रेसला प्रत्येकी २, राष्ट्रवादीला ५ जागा देण्यात आल्या आहेत. मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाले असून, ११ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी सायंकाळी मतदान पेटीत बंद झाले. शनिवार दि.२९ एप्रिल रोजी ला मतमोजणी होणार असून, संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक