शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटातही प्रवासी वाहतुकीसाठी एस. टी.ची बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:38 IST

State Transport Ratnagiri- राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळ कार्यरत असून, प्रवाशांच्या गर्दीतही चालक, वाहक सेवा देत आहेत. मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असला तरी चालक, वाहक, तसेच वाहक कम चालक मिळून एकूण ३,०९१ कर्मचारी दररोज ३,३५९ फेऱ्यांद्वारे एक लाख ३९ हजार ८५५ प्रवाशांची वाहतूक करत असल्याने प्रवाशांच्या संपर्कात येत आहेत.

ठळक मुद्दे३०९१ चालक-वाहकांचा रोज सव्वा लाख प्रवाशांशी संपर्क कोरोना संकटातही प्रवासी वाहतुकीसाठी एस. टी.ची बांधिलकी

मेहरून नाकाडेरत्नागिरी : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळ कार्यरत असून, प्रवाशांच्या गर्दीतही चालक, वाहक सेवा देत आहेत. मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असला तरी चालक, वाहक, तसेच वाहक कम चालक मिळून एकूण ३,०९१ कर्मचारी दररोज ३,३५९ फेऱ्यांद्वारे एक लाख ३९ हजार ८५५ प्रवाशांची वाहतूक करत असल्याने प्रवाशांच्या संपर्कात येत आहेत.लॉकडाऊननंतर एस. टी.ची वाहतूक हळूहळू रूळावर येत असतानाच पुन्हा कोरोना रुग्णवाढीचे संकट उभे राहिले आहे. आधीच तोट्यात असलेल्या एस. टी.ला आता लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने एस. टी. वाहतूक सुरू आहे. प्रवाशांच्या गर्दीत वाहक, वाहक कम चालक यांना वावरावे लागत आहे. तिकिटासाठी प्रवाशांशी संपर्क येत असला तरी वाहक, वाहक कम चालक आरोग्याची काळजी घेत आहेत. मास्कचा वापर केला जात असून, सॅनिटायझरचाही वापर सुरू आहे.शाळा, उद्योग-व्यवसाय, खासगी तसेच सरकारी आस्थापना सुरू आहेत. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण भागातील गाड्या प्रवाशांनी भरून धावत आहेत. काही मार्गावरील गाड्या तर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. प्रवाशांच्या गर्दीत वाहकाला तिकीट काढण्यासाठी वावरताना, प्रत्येक प्रवाशांशी संपर्क येतो. तिकीट, पैशांची देवाण-घेवाण होते. आरोग्याची काळजी घेत असताना सॅनिटायझर खिशात बाळगावेच लागते. सातत्याने सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ ठेवावे लागत आहेत.एस. टी.चे चालक, वाहक ड्युटी संपवून घरी जात असतानाच त्यांना स्वत:बरोबर कुटुंबीयांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. कोरोनाचे संकट असतानाही, प्रवासी वाहतुकीसाठी चालक, वाहक कर्तव्य बजावत असल्याने त्यांना विमा कवच उपलब्ध होणे आवश्यक आहे.प्रवाशांचा रोज प्रवासरत्नागिरी विभागातील नऊ आगारांमध्ये ५७८ एस. टी.द्वारे ३३५९ फेऱ्या सुरू असून, एक लाख ३९ हजार ८५५ प्रवाशांची दैनंदिन वाहतूक करण्यात येत आहे. ग्रामीण तसेच शहरी वाहतुकीस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गर्दीत वाहकांना वावरावे लागत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडत आहे.तपासणीच नाहीबेस्ट वाहतुकीसाठी रत्नागिरीतून मुंबईमध्ये गेलेल्या चालक वाहकांची कोरोना तपासणी करण्यात येत होती. काही चालक-वाहक, कर्मचाऱ्यांनी स्वत:हून तपासणी करून घेतली होती. मात्र, महामंडळ, अथवा शासनातर्फे एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी कोरोना तपासणीसाठी कोणतीच व्यवस्था अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही.

प्रवाशांची वाहतूक करणे हे आमचे कर्तव्य आहे. शासनाचे आदेश येईपर्यंत आमची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे. सुरुवातीला आम्हाला सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून दिले होते. मात्र, आता आम्ही स्वत:च खरेदी करीत आहोत, त्यामुळे महामंडळाने उपलब्धता करून देणे गरजेचे आहे.- संतोष शेट्ये, वाहक

कोरोनामुळे प्रत्येक फेरीनंतर गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. ही व्यवस्था कायम ठेवणे गरजेचे आहे, तरच कोरोना संसर्ग रोखण्यास काहीअंशी हातभार लागेल. एस. टी.चे प्रत्येक कर्मचारी कोरोना योद्धे असून, त्यांना ह्यआरोग्य कवचह्ण उपलब्ध होणे आवश्यक आहे.- मंगेश देसाई, चालक

प्रवाशांशी सातत्याने संपर्क येत असल्याने वाहक, चालकांना आरोग्याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. बसस्थानक, बसेस, कार्यालयात सॅनिटायझर उपलब्धता करण्यात आली असून, मास्क वापर सक्तीचा केला आहे. गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी