शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरीतील भगवती बंदरात क्रुझ टर्मिनलसाठी ३०२ कोटीची तरतूद, रोजगाराची संधी उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 19:29 IST

गेट वे सह अन्य जेट्टींसाठी ५७९ कोटी रु.खर्च करणार

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदरात क्रूझ टर्मिनल उभारण्यासाठी ३०२ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.गाळ काढणे व खोदकाम करणे, धक्का तयार करणे, लाटरोधक भिंतीची उंची वाढविणे, टर्मिनल इमारत उभारणे, रस्ते, वाहनतळ व फुटपाथ उभारणे, संरक्षक भिंत उभारणे, विद्युतीकरण, सांडपाणी योजना, उद्यान, अग्निरोधक यंत्रणा उभारणे यासाठी हा निधी खर्च करण्यात येईल. या प्रकल्पासाठी राज्य सरकार ५० टक्के तर केंद्र सरकार ५० टक्के निधी देणार आहे.राज्य सरकार २०२४-२५ मध्ये एक कोटी, २०२५-२६ मध्ये ७० कोटी तर २०२६-२७ मध्ये ८०.८१ कोटी असा १५१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी देईल. केंद्र सरकारही तेवढाच वाटा उचलेल.भगवती बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून १९ किमी अंतरावर भगवती बंदर असून जवळच विमानतळदेखील आहे. सद्यस्थितीत मुंबई ते गोवा अशी फेरीसेवा जलेश व आंग्रिया या क्रूझद्वारे सुरू आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीमध्ये कुठेही थांबा नाही. त्यामुळे पर्यटकांना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पर्यटन स्थळे पाहता येत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन स्थळे ही भगवती बंदराच्या आसपास आहेत. त्यामुळे भगवती बंदर येथे सुसज्ज असे क्रूझ टर्मिनल विकसित केल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. परिणामी स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या सागरीमाला प्रकल्पांतर्गत हे काम होणार आहे.याशिवाय, मोरा, ता. उरण येथे रो-रो जेट्टी बांधणे - ८८.७२ कोटी रु., खारवाडेश्री येथे जेट्टी व अन्य सुविधा निर्माण करणे - २३.६८ कोटी, कोलशेत, जि. ठाणे येथे जेट्टीचे बांधकाम करणे - ३६.६६ कोटी, मीरा-भाईंदर येथे जेट्टीचे बांधकाम ३० कोटी, डोंबिवली येथे जेट्टीचे बांधकाम २४.९९ कोटी, काल्हेर, जि. ठाणे येथे जेट्टीचे बांधकाम २७.७२ कोटी, गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ जेट्टीची उभारणी व अन्य कामे २२९ कोटी, एलिफंटा येथे जेट्टीची सुधारणा व पर्यटक सुविधांच्या उभारणीसाठी ८७.८४ कोटी, उत्तन डोंगरी, जि. ठाणे येथे रो-रो जेट्टीचे बांधकाम ३०.८९ कोटी असा एकूण ५७९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन