शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:01 IST

Ganeshotsav St Ratnagiri : यंदाही गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कोरोनाने आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गावी येणाऱ्यांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणात २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्दे गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणारपरिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

रत्नागिरी : यंदाही गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कोरोनाने आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गावी येणाऱ्यांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणात २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.

आषाढ महिना सुरू होतानाच गणेशोत्सवाचे वेध लागतात. गतवर्षापासून कोरोनाचे वातावरण असल्याने भाविकांच्या उत्साहाला ग्रहण लागले आहे. मात्र सध्या रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंधही कमी होत आहेत.परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मुंबई येथे ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून दि. ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून, चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. दि. १६ जुलै २०२१ पासून त्यासाठीच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी दि. ४ ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील, तर १४ ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेही म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून, सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.गणेशोत्सवादरम्यान एस. टी.ची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असेही परब यांनी सांगितले.कोकण रेल्वे फुल्लकोकण रेल्वेने आपल्या जादा गाड्यांची घोषणा आधीच केली आहे. तीन महिने आधी त्याचे आरक्षण सुरु होत असल्याने ते पूर्णही झाले आहे. आता एस. टी. महामंडळाने जादा गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी