शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रत्नागिरी जिल्ह्यातील १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:08 IST

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखाची कर्जमाफी मिळाली असून, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेतएप्रिलपासून जिल्ह्यात कर्जवितरण सुरू

रत्नागिरी : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखाची कर्जमाफी मिळाली असून, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत.सन २०१२ ते २०१६ असे सलग चार वर्षे अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जाची परतफेड करू शकले नाहीत. राज्य शासनाने २०१७ मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली.

या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखांवरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते.सन् २००९ - १० ते २०१५ - १६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार असतील, त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.

शासन निर्णयानुसार, जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती.

जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे मिळून ६१ हजार ४४१ शेतकरी कर्जदार आहेत. त्यातील ४७ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यत कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केल्याने ते पात्र ठरले होते.

पात्र शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली. राज्य शासनाकडून केलेल्या छाननीत जून २०१८ पर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ६७ कोटी ३४ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अद्याप १२ हजार ६१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरु आहे.सन २००१ ते २००९ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु त्या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचे लाभार्थी झाले नाहीत, अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा शासनाने केली होती, त्याची ही प्रक्रिया सुरू झाली.नव्याने कर्जवाटप सुरुनव्या खरीप हंगामासाठी एप्रिलपासून जिल्ह्यात कर्जवितरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ३० हजार ५०६ शेतकऱ्यांना ४० कोटी ८८ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी