शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नातेवाईकांना लुटणाऱ्याकडून १२ लाखाचे दागिने जप्त; तीन चोऱ्यांप्रकरणी कारवाई 

By संदीप बांद्रे | Updated: January 3, 2024 19:46 IST

चोरट्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

चिपळूण : काका, बहिण व आत्तेच्या घरी डल्ला मारणाऱ्या कापसाळ येथील ओंकार अनिल साळवी या तरूणाला येथील पोलिसांनी तीन चोरी प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून तब्बल १२ लाखाचे दागिने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे या चोरट्याने हे दागिने सोने तारण करणाऱ्या एका खासगी फायनान्स कंपनीत तारण ठेवून सुमारे २८ लाखाच्या कर्जाची उचल केली होती. या चोरट्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र बुधवारी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. 

नातेवाईकांकडे राहिल्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधून त्याचा फायदा ओंकार साळवी नेहमी उठवत होता. पाहूणा म्हणून आलेला ओंकार घरच्याप्रमाणे सर्वत्र राहत होता. मात्र त्या कालावधीत त्याचा डोळा त्या-त्या घरातील दागिन्यांवर होता. दागिने कुठे ठेवले जातात, कपाटाची चावी कुठे ठेवली जाते, याची पुरेपुर माहिती घेतल्यानंतर घरी कोणी नसताना तो दागिन्यांवर हात मारत होता. त्यातून त्याने नात्यातील काका, बहिण, आत्या यांच्या घरी चोरी केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर कापसाळ गावी देखील त्याने चोरी केल्याचे प्रकार उघडकीस येताच त्याला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केल्यानंतर चिपळूण शहरातील एका सोने तारण करणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीत चोरीचे दागिने गहाण ठेवून २८ लाखाच्या कर्जाची उचल केल्याची  धक्कादायक प्रकार पुढे आला. पोलिसांनी तत्काळ संबंधीत बँकेकडून हे दागिने जप्त केले. सुमारे १२ लाख ५० हजार रूपये इतक्या किंमतीचे दागिने त्याने चोरले असून त्यातील ११ लाख ३३ हजार रूपयांचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. कापसाळ दुकानखोरी येथील अमोल साळवी यांचे ५ लाख ८ हजाराचे दागिने, जयश्री अवधूत साळवी यांचे ५ लाख ३६ हजार, तर स्नेहल सचिन सावंत हिचे २ लाख ३६ हजाराचे दागिने चोरीला गेले होते. हे दागिने ओंकार अनिल साळवी (२८, रा. दुकानखोरी, कापसाळ) यानेच चोरल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांच्या घरातच चोरी केल्या प्रकरणी ओंकार साळवीला मुंबईत साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणी पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक शाम आरमाळकर, पूजा चव्हाण, अरूण जाधव, पोलिस हवालदार  संतोष शिंदे, पाडुरंग जवरत, वृक्षाल शेटकर, संदीप मांडके, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कदम, गणेश पडवी, कृष्णा दराडे यांनी कामगिरी पार पाडली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण