शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:16 IST

सर्व महिलांची प्रकृती स्थिर

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील एका बेकरीमधून आणलेला पेढा खाल्ल्याने ज्वेलरीच्या दुकानात काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाल्याचा प्रकार साेमवारी सकाळी घडला. या महिलांना तत्काळ शृंगारतळीतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.शृंगारतळी येथील ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागे एका इमारतीत ज्वेलरीचे दुकान आहे. ज्वेलरीचे मालक महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून मुंबईहून ज्वेलरीचे साहित्य आणून ते महिलांकडे देतात. त्यातून या महिला ज्वेलरी तयार करतात. श्रावण महिना असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या एका महिलेने साेमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका बेकरीतून पेढे आणले हाेते. त्यातील अर्धा-अर्धा पेढा कामावर असलेल्या महिलांना तिने दिला. काही वेळाने महिलांना चक्कर आली आणि उलटी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सर्व महिलांना तातडीने शृंगारतळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यामध्ये स्वप्नाली पवार, प्रतीक्षा मोहिते, पूजा मोहिते, वृषाली पवार, विदिशा कदम, सोनाली नाईक, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, प्रिया मोहिते, संजना गिरी व मानसी शिगवण या महिलांचा समावेश आहे. या सर्व महिला गुहागर तालुक्यातील तळवली, मळण, पालपेणेमधील राहणाऱ्या आहेत.या महिलांनी श्रावणी सोमवारचा प्रसाद म्हणून अर्धा-अर्धा पेढा खाल्ला व काही वेळातच त्यांना चक्कर व उलट्या होण्यास सुरुवात झाली. महिलांनी खाल्लेल्या पेढ्यामुळे त्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या महिलांवर उपचार करणाऱ्या डॉ. राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सर्व महिलांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.