शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:47 PM

liquor ban Ratnagiri : खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक बोलेरो पिकअप टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला असून, या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून, या प्रकरणी बोलेरो टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोटे येथे गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक बोलेरो पिकअप टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला असून, या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून, या प्रकरणी बोलेरो टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी कुंभार्ली घाटात मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या दारूसह सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. कोकण विभागात ही मोठी कारवाई मानली जाते. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अजून अधिकच दक्ष झाले आहे.दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, रत्नागिरी जिल्हा प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली खेड व चिपळूण विभागातील निरीक्षक व कर्मचारी यांनी लोटे येथे गोव्याकडून येणाऱ्या २५ रोजी वाहनांची तपासणी मोहीम राबवली. यावेळी या परिसरात गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग खेडचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव यांना एक गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार लोटे एक्सेल फाटा येथे संशयित वाहनांची तपासणी करीत असताना बोलेरो पिकअप टेम्पो या वाहनास तपासणीसाठी थांबवले असता त्या टेम्पोच्या मागील हौद्यामध्ये खाकी रंगाच्या पुठयांच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या दारूचे ९२ बॉक्स आढळून आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालक पांडुरंग दयानंद कदम ( रा. वालोपे बेंडकरवाडी, चिपळूण) याच्याकडून गोवा बनावटीची दारू, बोलेरो पिकअप गाडी, मोबाईल असा ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव तसेच दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. बी. भालेकर, जवान ए. के बर्वे तसेच चिपळूण विभागाचे प्रभारी निरीक्षक एस. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक एन. डी. पाटील, जवान आणि वाहन चालक अतुल वसावे तसेच जवान एस. एन. वड व शेख यांनी केली आहे. अधिक तपास प्रभारी निरीक्षक शंकर जाधव करीत आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागLanja Police Thaneलांजा पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी