रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह अन्य सहा ठिकाणी असलेल्या व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत किऑस्क या प्रकल्पाचा आतापर्यंत जिल्ह्यातील १०,२३४ मतदारांनी लाभ घेतला.मतदारांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक आयोगाने नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविले आहेत. यापैकी एक प्रकल्प म्हणजे व्होटर हेल्प डेस्क या किऑस्क सुविधेच्या माध्यमातून मतदारांना त्यांचे मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, असल्यास कोणत्या बुथमध्ये, मतदान कुठे करायचे, तसेच याव्यतिरिक्त मदत हवी असल्यास १९५० मदत केंद्रावर चोवीस तास मोफत संपर्क साधून शंकांचे निरसन करता येते.किऑस्क ही सुविधा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा न्यायालय, खेड, चिपळूण, राजापूर, दापोली, गुहागर अशा एकूण सात ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ आतापर्यंत १०,२३४ नागरिकांनी घेतला आहे.विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते.देशातील पहिले शहरजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अत्यंत नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक अशा व्होटर हेल्प डेस्कचा वापर करणारे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय हे भारतातील पहिले शहर ठरले आहे.
व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत रत्नागिरीत १०,२३४ मतदारांनी घेतला किऑस्कचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:03 IST
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह अन्य सहा ठिकाणी असलेल्या व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत किऑस्क या प्रकल्पाचा आतापर्यंत जिल्ह्यातील १०,२३४ मतदारांनी लाभ घेतला.
व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत रत्नागिरीत १०,२३४ मतदारांनी घेतला किऑस्कचा लाभ
ठळक मुद्दे व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत १०,२३४ मतदारांनी घेतला किऑस्कचा लाभ रत्नागिरी जिल्हा : मुख्य प्रशासकीय इमारतीसह अन्य सहा ठिकाणी प्रकल्प