शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

आठवड्याचे राशीभविष्य - 9 जून ते 15 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 09:45 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

 

हा आठवडा आपणास मिश्रफलदायी आहे. नोकरी करणार्यांना वरिष्ठांचे व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. व्यापारात लाभ होतील. या आठवड्यात थकबाकीचे पैसे सुद्धा मिळू शकतील. खर्चात वाढ किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात जपून राहावे, अन्यथा एखाद्या चुकीमुळे आपण दुसऱ्या कामात गोवले जाऊ शकता. आपण आपल्या व्यवसाय वृद्धीचा विचार करू शकता, व त्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी विशेष असा अनुकूल नाही. अभ्यासात लक्ष लागणे कठीण आहे... आणखी वाचा

वृषभ

आठवडा आपणास खूपच अनुकूल आहे. त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा उचलावयास हवा. कदाचित आपणास ते अवघड वाटेल, मात्र कठोर परिश्रम करूनच आपली सर्व कामे सहजपणे होऊ शकतील. ह्या आठवड्यात आपण नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करू शकता. व्यापारात सुद्धा लाभ लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. आपण पडद्यामागे राहून सुद्धा एखादे काम चांगल्या पद्धतीने करू शकाल. ह्या आठवड्यात आपणास कोणत्याही प्रकारे मदतीची गरज भासणार नाही... आणखी वाचा

मिथुन

आठवडा आपणास मिश्र फलदायी आहे. आर्थिक लाभ होतीलच, शिवाय कामातील धावपळ सुद्धा वाढेल. नोकरीत सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळू शकेल. व्यापारी वर्गासाठी नवीन संधी दार ठोठावतील. खर्चात वाढ झाल्याने आपण विचलित होण्याची शक्यता आहे. आपणास स्वतःला कामात गुंतवून ठेवणे हितावह राहील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. कुटुंबीय व मित्रांशी आपली जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील व पती - पत्नी संबंधात गोडवा राहील... आणखी वाचा

कर्क

काही गोष्टी वगळल्यास हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. आपण प्रत्येकास मदत करण्यासाठी तयार राहाल. त्यासाठी आपण पैसे सुद्धा खर्च कराल. मनोरंजनाच्या वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या उत्साहात भर पडेल. आपण चिंतामुक्त होऊन प्रत्येक कामात यश प्राप्त करू शकाल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी असल्याचे दिसून येईल. त्यांना यशस्वी होण्यासाठी आपली मेहनत वाढवावी लागेल... आणखी वाचा 

सिंह

हा आठवडा आपल्यासाठी विशेष अनुकूल नाही. त्यामुळे ह्या आठवड्यात सावध राहावे लागेल. मात्र, आठवड्याचे दुसरे पर्व काही अंशी चांगले असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या क्रोधास सामोरे जावे लागेल. आपल्याहून कनिष्ठ असणारे सुद्धा आपणास त्रास देण्याची शक्यता आहे. आपणास कोणतेही मोठे उद्दिष्ट हाती न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अचानकपणे एखाद्या कामात पैसे खर्च करावयास लागल्याने आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कन्या

आठवडा आपणास विशेष असा चांगला नाही. मानसिक त्रासामुळे आपण गोंधळून जाल. कोणताही निर्णय घेण्यात आपणास त्रास होऊ शकतो. कामात यश प्राप्ती न झाल्याने मन उदास होईल. मात्र, नवीन कामासाही हा आठवडा उत्तम आहे. आपण पैसे मिळविण्याचे नवीन मार्ग शोधून काढाल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. प्रणयी जीवन चांगले राहील. दूरवर राहणाऱ्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल... आणखी वाचा

तूळ

आठवडा एकंदरीत आपल्यासाठी उत्तमच आहे. नोकरी करणारे व व्यापारी व्यक्ती लाभाची अपेक्षा बाळगू शकतात. आपणास आर्थिक लाभ होतील. मात्र, ह्या आठवड्यात एखाद्या कामासाठी अनिच्छेने आपणास मोठा खर्च करावा लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, हळू हळू परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक दृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल... आणखी वाचा

वृश्चिक

आठवड्याच्या सुरवातीस आपणास काही त्रास होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस आपणास हिंमतीने कामे करावी लागतील. आपण कामाचा वेग वाढवण्यावर लक्ष देऊ शकाल. सरकारी कामात आपणास खूप सावध राहावे लागेल. एखादा महत्वाचा दस्तावेज हरवल्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या अखेरीस आपणास लाभ होईल. व्यवसायात सुध्दा फायदा होईल. आपण व्यापार वृद्धीचा विचार सुध्दा करू शकाल. नोकरी करणार्यांना ह्या आठवड्यात फायदे होतील... आणखी वाचा

धनु 

आठवडा आपल्यासाठी चांगला होऊ शकतो, मात्र मोठा बदल करण्याचा प्रयत्न करू नये. ह्या आठवड्यात नोकरी - व्यवसायात कोणतीही व्यूह रचना करू नये, मात्र जे काही चालले आहे त्यास चांगले करण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात एखाद्या विशेष कार्यात यश न मिळाल्याने मन बेचैन होईल. कष्टाच्या जोरावर आपल्या विरोधकांवर मात करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल. जुन्या मित्राचा सहवास सुखद होईल. महिला मित्रांसह एखाद्या लहानशा प्रवासास जाऊ शकाल... आणखी वाचा

मकर 

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या दरम्यान कोणत्याही नवीन कामाची सुरवात करण्यापूर्वी खूप विचार - विमर्श करावा. कामात अपेक्षित यश प्राप्ती न झाल्याने आपण क्रोधीत होण्याची शक्यता आहे. आपण विरोधकांचा सामना यशस्वीपणे करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चढ - उताराचा आहे. ह्या आठवड्यात शारीरिक व मानसिक स्फूर्तीचा थोडा अभाव जाणवेल. एखाद्या क्षुल्लक कारणाने कुटुंबात मोठा वाद होऊ शकतो... आणखी वाचा

कुंभ

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. कामात धावपळ होईल. ह्या आठवड्यात स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल. आपण आपल्या कौशल्याने वरिष्ठांना प्रसन्न करून मोठा पुरस्कार प्राप्त करून घेऊ शकाल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. सरकारी कामात सावध राहण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या आठवड्यात आपले वैवाहिक जीवन उत्तम राहून आपणास त्याचा आनंद उपभोगता येईल. आपले प्रणयी जीवन सुद्धा चांगले राहील... आणखी वाचा

मीन 

आठवड्याची सुरुवात आपणास अनुकूल असली तरी आठवड्याच्या अखेरीस शांत राहून आपले काम करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नोकरीत सहकार्याचे अपेक्षित सहकार्य लाभेल. विरोधकांवर मात करू शकाल. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रसन्न होतील. भागीदारीच्या कामात यश प्राप्ती होऊ शकेल. अचानक काही खर्च झाल्याने आपले मन विचलित होण्याची शक्यता आहे. अचानकपणे नशिबाने आपली साथ सोडली असे आपणास वाटेल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष