शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

आठवड्याचे राशीभविष्य- 5 मे ते 11 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 10:49 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवड्याची सुरुवात खूपच चांगली होणार आहे. आपण खूपच व्यवहारी व्हाल. आपल्या व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्या आपण सहजपणे दूर करू शकाल. व्यापारी भागीदारीचा आपणास मोठा फायदा होईल. नोकरीत विरोधक आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण आपल्या बुद्धी चातुर्याने त्यांच्यावर सहजपणे मात करू शकाल. या आठवड्यात नोकरी किंवा व्यापारी बैठकीसाठी बाहेरगावी जावे लागण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

वृषभ

आठवड्याच्या सुरुवातीस मानसिक अशांतता जाणवेल. कारकिर्दीत किंवा व्यवसायात एखाद्या व्यक्तीशी वाद होऊन कामाच्या ठिकाणी आपली मान खंडना होण्याची शक्यता आहे. आपण अधिकच आळसावून जाल. त्यामुळे नोकरीत खूप त्रास होईल. सहकाऱ्यांशी संवाद साधताना आपणास सावध राहावे लागेल. व्यापारात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. या आठवड्यात एखाद्या गोष्टीचे नियोजन होऊ शकेल. आठवड्यात प्राप्तीत वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकाल... आणखी वाचा

मिथुन

आठवड्यात आपल्या मनात नव - नवीन विचार येतील. कधी कधी नोकरीत किंवा व्यापारात बदल करण्याचा सुद्धा विचार येईल. व्यापारातील भागीदाराशी एखाद्या बाबतीत वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या बैठकीसाठी किंवा व्यापारी कामासाठी आपण बाहेरगावी सुद्धा जाऊ शकाल. आपण धीर धरावयास हवा. यश प्राप्तीसाठी अपार कष्ट करावे लागतील. आर्थिक दृष्ट्या आठवड्याची सुरवात काहीशी कमकुवतच असेल. कौटुंबिक कारणांसाठी पैसे खर्च होतील... आणखी वाचा

कर्क

आठवड्यात आपले मन कमकुवत राहील. उगाचच विचार करत राहिल्याने आपणास दुःख होईल. नोकरीत उद्दिष्ट गाठण्याकडे लक्ष देत असताना नकारात्मक विचारांमुळे अडथळे निर्माण होतील. व्यापार वृद्धीसाठी कोणत्याही प्रकारे खर्च होईल, जो आपणास पसंत नसेल. या आठवड्यात एखाद्या अनावश्यक खर्चामुले आपण दुःखी व्हाल. मात्र, आठवड्याच्या अखेरीस केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून भविष्यात फायदा होईल... आणखी वाचा

सिंह 

आठवड्यात एखाद्या कामात अडकून पडल्याने आपल्या अडचणीत वाढ होईल. बाहेरील व्यक्तींशी आपले व्यावसायिक संबंध दृढ होतील. या आठवड्यात व्यापारासाठी एखादा प्रवास करावा लागेल. आपणास विदेशातून लाभ होईल. नोकरीत सहकारी आपल्याशी चांगले वागतील. आठवड्यात विविध क्षेत्रात आपले कौशल्य दिसून येईल. ह्या आठवड्यात कौटुंबिक गरजांसाठी किंवा एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी पैसा खर्च होईल... आणखी वाचा

कन्या 

काही गोष्टी वगळल्यास हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. व्यापाराशी संबंधित कार्यात लाभ होईल. तसेच एखादे पूर्व नियोजित कार्य पूर्ण झाल्याने आपणास हलके वाटेल. व्यापार वृद्धीचा विचार सुद्धा करू शकाल. व्यापारात भागीदारीमुळे फायदा होईल. प्राप्तीत वाढ होईल. एखाद्या उद्योगाशी संबंध जोडल्याने सुद्धा आपणास फायदा होऊ शकेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, व ते भविष्यात एखादा विशेष अभ्यासक्रम करण्याचे नियोजन सुद्धा करू शकतील... आणखी वाचा 

तूळ

आठवड्याच्या सुरुवातीस थोडा त्रास झाला तरी सुद्धा एकंदरीत हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरीत आपल्याला देण्यात आलेले काम आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. व्यापारवृद्धीसाठी आपण एखाद्या बैठकीत सहभागी होऊ शकता. अनावश्यक कामांवर पैसा खर्च होऊ शकतो. हौस - मौज ह्यासाठी सुद्धा खर्च होण्याची शक्यता आहे. व्यापारात मात्र फायदा होईल. महिला मित्रांकडून सुद्धा काही लाभ संभवतात... आणखी वाचा

वृश्चिक

आठवड्यात नोकरी - व्यवसायात लाभ होऊ शकेल. व्यापारी बैठकीसाठी बाहेर जाण्याचे नियोजन करू शकाल. विरोधकांचा काही त्रास जाणवणार नाही. आठवड्याच्या दुसऱ्या चरणात खर्चात वाढ झाल्याने आपण चिंतीत व्हाल. या आठवड्यात नोकरी - व्यवसायात जरी सर्व काही चांगले चालले असले तरी सुद्धा एखाद्या लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. कोणतेही काम आवेशात येऊन करू नका, अन्यथा मानहानीस सामोरे जावे लागेल... आणखी वाचा

धनु

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. कार्यालयात कामाच्या धीम्या गतीमुळे आपणास वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. त्यामुळे कदाचित आपले नोकरीत मन रमणार सुद्धा नाही. आठवड्याच्या दुसऱ्या भागात व्यापारात फायदा होऊ शकेल. आठवड्याच्या अखेरीस परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत असून नोकरीत काही लाभ पदरी पडू शकेल. या दरम्यान कामे पूर्ण झाल्याने वरिष्ठ आपल्यावर खुश होऊ शकतील... आणखी वाचा

मकर 

आठवडा एकंदरीत आपल्यासाठी उत्तम आहे. आपण एखादी दीर्घ कालीन गुंतवणूक करू शकाल. एखादी संपत्ती सुद्धा खरेदी करू शकाल. मात्र, अनावश्यक बाबींवर खर्च झाल्याने काही नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा उत्तम आहे. आपल्या कौशल्याने आपण वरिष्ठांना प्रभावित करू शकाल. आत्मविश्वास उत्तम असल्याने आपण कोणतेही अवघड काम करण्याचा सुद्धा प्रयत्न कराल... आणखी वाचा

कुंभ

मागील आठवड्यापेक्षा हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आजचे काम उद्यावर ढकलू नका. कार्यालयात आपण स्वतःला सिद्ध करू शकाल, व त्यामुळे आपली उपयोगिता वाढेल. सुरवातीस वरिष्ठांना प्रभावित करण्यात त्रास होईल. व्यापारासाठी आपण एखाद्या छोट्या प्रवासास सुद्धा जाऊ शकाल. या आठवड्यात शेअर्स बाजारात गुंतवणूक करणे आपल्यासाठी हितावह नाही. मनोरंजन, सहल व खरेदी यासाठी खर्च होईल... आणखी वाचा

मीन

आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी उत्तम असेल. एखाद्या नवीन कामाची सुरवात करू शकाल, व त्यात आपले मन सुद्धा रमेल. नशिबाची साथ मिळत असल्याचे जाणवेल. नोकरी किंवा व्यापारा निमित्त एखादा प्रवास सुद्धा घडू शकतो. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. मात्र, या आठवड्यात अनावश्यक कार्यात पैसा सुद्धा खर्च होईल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा उत्तम आहे. अभ्यासासाठी अनुकूलता लाभल्याने त्यांचे अभ्यासात लक्ष सुद्धा लागू शकेल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष