शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

आठवड्याचे राशीभविष्य - 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 09:13 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवडा आपल्यासाठी एकंदरीत कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात समतोलपणा साधणारा आहे. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह आनंदात दिवस घालवू शकतील तसेच त्यांच्या गरजा भागविण्यासाठी नोकरी - व्यवसायाकडे सुद्धा अधिक लक्ष देतील. आठवडयाच्या मध्यास नोकरीत आपले कौशल्य दाखविण्याची उत्तम संधी लाभेल... आणखी वाचा

वृषभ

आपल्यात शक्ती व स्फूर्ती उत्तम असल्याने काम करण्यात आपण कोठेही कमी पडणार नाहीत. अशा परिस्थितीत व्यावसायिक आघाडीवर व कुटुंबातील व्यक्ती आणी मित्र ह्यांची चांगली साथ लाभल्याने आपण चांगली प्रगती करू शकाल. त्यामुळे चांगली प्राप्ती होण्याची शक्यता सुद्धा आहे. आपल्या वागणुकीमुळे व प्रभावामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील... आणखी वाचा

मिथुन 

आठवडयाच्या सुरुवातीस व्यक्तिगत व व्यावसायिक आघाडीवर शांततेचा अनुभव येईल. भावंडांमुळे आपणास लाभ होईल. पूर्वार्धात मित्र व स्वकीयांची भेट होईल, तसेच व्यावसायिक कारणांसाठी त्यांच्यासह छोटे प्रवास होऊ शकतील. व्यावसायिक आघाडीत उच्च पदस्थ व वरिष्ठयांच्याशी संबंध उत्तम राहतील. कुटुंबात एखाद्या वडिलधार्या व्यक्तीकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा बाळगू शकता... आणखी वाचा

कर्क 

आठवडयाच्या पहिल्या दिवशी आपण मानसिक दृष्टया प्रफ्फुलीत राहिल्याने चेहऱ्यावर तेज वाढेल. आपल्यात आत्मविश्वास असल्याचे सुद्धा जाणवेल. व्यावसायिक आघाडीवर चांगली सुरवात होऊन संपूर्ण आठवडाच चांगला जाईल. कोणत्याही प्रकारे धनप्राप्ती व विविध लाभ मिळण्याची दाट शक्यता असल्याने काळजीचे काहीच कारण नाही... आणखी वाचा

सिंह

आठवडयाच्या सुरुवातीसच आवेश व भावना संयमात ठेवून शांतपणे आपले म्हणणे मांडावे. रागामुळे नोकरी - व्यवसायात किंवा घरात एखाद्याशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील. यश मिळविण्यासाठी इतर मार्गांचा वापर करताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जमीन-जुमल्याचे दस्तावेज करण्यात फसवणूक होण्याची शक्यता अधिक असल्याने सतर्क राहावे... आणखी वाचा

कन्या

आपली मानखंडना होईल अशा कामांपासून दूर राहावे. तसेच प्राप्ती वाढ होण्यासाठी आडमार्ग अवलंबू नये. मधुमेह, अपचनामुळे होणारे पोटाचे विकार, हृदय विकार ह्यापासून जपून राहावे. खोटया कल्पनेमुळे आपली लाचारी वाढेल. संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य आपल्या काळजीस कारणीभूत ठरेल... आणखी वाचा

तूळ

आठवडयाच्या प्रारंभी आपल्या व्यापार - व्यवसायात भरभराट होत असल्याचे दिसून येईल. नोकरीतील उल्लेखनीय कामगिरीची सुद्धा नोंद घेतली जाईल. प्राप्तीच्या साधनात वाढ झाल्याने आपली आर्थिक चिंता दूर होईल. लोक काय म्हणतील ह्याकडे दुर्लक्ष करून आपण एखाद्या नवीन पद्धतीची सुरुवात कराल. आठवडयाच्या उत्तरार्धात आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडयाच्या सुरुवातीस धार्मिक कार्य, देव दर्शन व धार्मिक स्थळाच्या भेटीने आपणास आनंद होईल. परोपकार व निःस्वार्थ सेवा भावनेने प्रेरित होऊन या कार्यांसाठी आपण पैसा खर्च कराल व स्वतः सुद्धा सेवा कार्यात सहभागी व्हाल. राष्ट्रीय स्तरावरील कार्ये, बहुराष्ट्रीय संस्थेतील नोकरी, परदेशातील नोकरी किंवा व्यापाराचे प्रयत्न, दूरवरच्या ठिकाणी व्यापार विस्तार किंवा व्यावसायिक हेतूने प्रवास करण्यास आठवडयाचा पहिला दिवस अनुकूल आहे... आणखी वाचा

धनु 

आठवडयाच्या सुरुवातीस काहीशी प्रतिकूलता जाणवेल. आजारपणामुळे वैद्यकीय खर्च करावे लागतील. हा खर्च अचानकपणे उदभवणारा सुद्धा असू शकतो. आठवडयाच्या सुरुवातीस आपण धार्मिक प्रवृत्तीत गुंतलेले असाल. एखाद्या धार्मिक स्थळी जाणे सुद्धा संभवते. ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहाल. आपली वृत्ती न्यायप्रिय राहील. व्यावसायिक आघाडीवर आठवडयाची सुरुवात काहीशी नाजूक राहील... आणखी वाचा

मकर

आठवडयाच्या प्रारंभी आपण व्यापार - व्यवसायाच्या विकासासाठी उत्तम असे नियोजन करू शकाल. आर्थिक देवाण - घेवाण सुरळीत होईल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आपल्या कामाची प्रशंसा करून वरिष्ठ आपला विशेष सन्मान करतील.  बोलण्यात संयम न बाळगल्यास जाणता - अजाणता कोणाचे मन दुखावू शकेल... आणखी वाचा

कुंभ

प्रकृती वगळता इतर बाबींसाठी हा आठवडा अनुकूल आहे. कार्यस्थळी व सार्वजनिक स्थळी आपल्या मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. भागीदारांशी संबंधात सौहार्द टिकून राहील. भागीदारीत पुढील वाटचाल करण्यास सुद्धा अनुकूल संधी लाभू शकेल. शेअर्स बाजार किंवा कोणत्याही प्रकारच्या सट्टाकीय प्रवृत्तीशी संबंधित असलेल्यांनी सध्या नवीन धाडस करू नये... आणखी वाचा 

मीन

आठवडयात आपण सर्वांगी प्रगती व प्रत्येक प्रकारच्या संबंधातील सौख्य उपभोगू शकाल. त्याच बरोबर भक्ती व विरक्ती यांच्या भावनेने आपल्या जीवनातील समतोलपणा टिकवू शकाल. व्यावसायिक आघाडीवर आपण प्रगती साधू शकाल. सध्या नवीन काही करण्या ऐवजी हाती जे काही आहे त्यात स्थैर्य राखण्यावर आपले लक्ष केंद्रित राहील... आणखी वाचा 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष