शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

आठवड्याचे राशीभविष्य - 10 मार्च ते 16 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 10:07 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

 

आठवडयाच्या सुरुवातीस स्वभावातील हट्टीपणा व उग्रता ह्यांना संयमित ठेवण्याचा सल्ला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसात आपण उग्रतेसह अधिक भावनाशील राहाल, व त्यामुळे इतरांशी आपली वागणूक ही वेगळीच असू शकेल. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे किंवा कटाक्ष फेकण्याच्या वृत्तीमुळे एखाद्याच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल... आणखी वाचा

वृषभ 

आठवडयाची सुरुवात शारीरिक व मानसिक बेचैनीने होईल. आर्थिक चिंतेमुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडू शकेल. घरातील वातावरण सुद्धा गढूळ राहील. कुटुंबियांशी कटुतेचे प्रसंग उदभवतील. खर्चाची काळजी वाटेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळाल्यास निराश होण्या ऐवजी त्या मागील कारण मीमांसा करावी... आणखी वाचा

मिथुन

आठवडयाच्या सुरुवातीस सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रां द्वारा लाभ होतील व त्यांच्यासाठी आपण खर्च सुद्धा कराल. विवाहेच्छुकांना जोडीदाराचा शोध घेण्यास अनुकूल दिवस आहेत. विदेशात व्यापार करणाऱ्या किंवा विदेशी संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त ऑर्डर किंवा बक्षिसीच्या स्वरूपात अतिरिक्त प्राप्ती होईल... आणखी वाचा

कर्क 

आठवडयाची सुरुवात उत्साही वातावरणात होईल. सुरुवातीस आपल्या धाडसामुळे कदाचित आपण यशस्वी होऊ शकला नाहीत तरीही नंतर हेच धाडस आपल्या यशास कारणीभूत ठरेल. आपली धाडसी वृत्ती वाढेल. नशिबाची साथ लाभेल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद व माता - पित्यांचे सहकार्य मिळू शकेल. आपणास आपल्या कार्यक्षेत्रात मोठे पद मिळण्याची शक्यता दिसत आहे... आणखी वाचा

सिंह 

संपत्तीत वाढ होईल. आपण बाहेरगावी जाण्याचा कार्यक्रम आखाल, परंतु त्या दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. झोपेतील अनियमिततेचा प्रकृतीवर परिणाम होईल. कारकिर्दीत समर्पण व निष्ठा ह्यांच्या सोबतच आपण आपली उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल. आपण सावध राहावे. प्रणयी जीवनात गैरसमज होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कन्या 

आपण आपल्या भावना आप्तजनां समक्ष व्यक्त कराल. एखाद्या मध्यस्थाच्या मदतीने जुन्या वादाचे निराकरण होऊ शकेल. आपली आवडती वस्तू रास्त भावात मिळू शकेल. आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम व आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. मानसिक चांचल्य व दिशाहीनतेमुळे अभ्यासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

तूळ

आठवडयाच्या सुरुवातीस आपण दृढ आत्मविश्वास व मनोबलाच्या जोरावर प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ शकाल. कुटुंबात आनंद व शांती नांदेल. वैवाहिक जोडीदार किंवा प्रियव्यक्तीशी संबंधात सौहार्द राहील, परंतु काही कारणाने ते क्रोधीत झाल्यास आपण मात्र शांत राहावे. आपली प्रकृती सुरवातीस चांगली राहील. आपल्या प्रवृत्तीत हळू हळू बदल घडेल... आणखी वाचा

वृश्चिक

घरातील वातावरण शांत व आनंदी राहिल्याने आठवडयाची सुरुवात खूपच छान होईल. कामात स्पर्धक व शत्रूंवर मात करता येईल. कार्यालयात वरिष्ठ व सहकर्मचार्यांचे चांगले सहकार्य मिळवू शकाल. मातुलाकडून काही बातमी मिळेल. खोळंबलेली कामे पूर्णत्वास येतील. आठवडयाच्या मध्यास दैनंदिन कार्यांपेक्षा काहीतरी वेगळेच करून आपण दिवस घालवाल... आणखी वाचा

धनु

आठवडा आपल्यासाठी आनंददायी असणार आहे. घरात नूतनीकरणाचे किंवा दुरुस्तीचे काम होईल. मातुला कडून एखादी चांगली बातमी मिळेल. काही सामाजिक कारणांमुळे आपल्या प्रणयी जीवनात एखादी समस्या निर्माण झाली असेल किंवा आपल्या प्रिय व्यक्तीशी काही मतभेद किंवा कटुता निर्माण झाली असेल तर त्यात सुधारणा होताना दिसून येईल... आणखी वाचा 

मकर 

मार्च महिन्यातील हा आठवडा चांगला असल्याचे ग्रहांच्या गोचर भ्रमणावरून दिसत आहे. घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्ती काम होण्यास दिवस अनुकूल आहेत. जुन्या किंवा नवीन घराची खरेदी - विक्री करण्यास अनुकूलता आहे. तसेच जुन्या किंवा नवीन वाहनांची खरेदी - विक्री सुद्धा होऊ शकेल. आपल्या वैवाहिक जीवनात परिपकवता असल्याचे जाणवेल... आणखी वाचा

कुंभ

आठवडयाच्या सुरुवातीस आपणास शारीरिक व मानसिक प्रसन्नता अनुभवता येईल. आपल्या मनावर असलेले चिंतेचे दडपण दूर झाल्याने आपला उत्साह वाढेल. भावंडांशी मिळून नवीन आयोजन हाती घ्याल, तसेच त्यांच्यासह आनंदात दिवस घालवू शकाल. मित्र व स्वजनांसह छोटे प्रवास करू शकाल. कार्यक्षेत्रात नवीन प्रणाली स्वीकारून चांगले परिणाम मिळवू शकाल... आणखी वाचा

मीन

आठवडयाच्या सुरुवातीस आर्थिक बाबतीत आपली सक्रियता वाढेल. प्राप्ती वाढविण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहाल. एखाद्या ठिकाणाहून उसने पैसे घेण्यासाठी, कर्ज काढण्यासाठी किंवा व्यापारातील वसुलीसाठी प्रयत्न वाढतील. मात्र, अशा वेळेस आपली वाणी संयमित ठेवावी, अन्यथा होऊ घातलेल्या कामात अडथळा निर्माण होईल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष