शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

साप्ताहिक राशीभविष्य - २३ जानेवारी २०२२: कर्क राशीतील व्यक्तींना शेतीच्या व्यवहारात फायदा होईल; नवीन जबाबदारी अंगावर पडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 08:22 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...      

मेष -  कामाची दखल घेतली जाईल. समाजसेवेत पुढाकार घ्याल. हातून एखादे महत्वाचे काम होईल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. आर्थिक आवाक चांगली राहील. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस

वृषभ- शब्दाला किंमत राहील. या सप्ताहात अनाश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करु नका. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवारी, शनिवार चांगले दिवस.

मिथुन -  भेटवस्तू मिळतील. रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत प्रगती प्राप्त होईल. मनासारखी कामे होतील. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

कर्क - घरी पाहुणे येतील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नवीन ओळखी होतील. नवीन कामे मिळतील. घर, शेतीच्या व्यवहारात फायदा होईल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार बुधवार चांगले दिवस.

सिंह -  संधीचे सोने कराल. नोकरीत प्रगती होईल. नवीन संधी मिळेल. त्या संधीने आपण सोने कराल. धनलाभच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मानसन्मान मिळेल. टीप- रविवार, सोमवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

कन्या - अडचणी दूर होतील. व्यवसायात भरभराट होईल. तब्यतेची काळजी घ्या. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरात धार्मिक कार्यक्रम होतील. महिलांच्या मनावरचा ताण हलका होईल. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ- व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनूसार वागेल. जमिनींच्या व्यवहारात सावधानता बाळगा. भावंडांची साथ मिळेल. काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. महिलांना घराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार चांगले दिवस.

वृश्चिक - आर्थिक आवाक चांगली राहिल. नोकरीत प्रगती होईल. चांगल्या संधी चालून येतील. मालमत्तेच्या व्यावहारात फायदा होईल. विविध कामांना गती मिळेल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. टीप- रविवार, सोमवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

धनु - प्रगतीकडे लक्ष द्या. विविध प्रकारचा लाभ होईल. आर्थिक आवाक चांगली राहिल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनूसार वागेल. महिलांना जोडीदाराचे प्रेम मिळेल. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

मकर -  व्यवसायात भरभराट होईल.  आर्थिक आवाक चांगली राहिल. प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल सुरु राहिल.दिशाभूल करणारे लोक टाळा. विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्रांच्या सहवासात रहावे. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

कुंभ- विविध प्रकारचा लाभ होईल. भेटवस्तू मिळतील. भाग्याची साथ राहिल. वेळ वाया घालवणाऱ्या लोकांपासून दूर रहा. महिलांना जीवनसाथीचे प्रेम मिळेल. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

मीन- सर्वांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत मोठी संधी मिळेल. महिलांना घरातील कामात दास्त वेळा द्यावा लागेल. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. टीप- रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस

 -विजय देशपांडे(ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष