शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 8 मार्च ते 14 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 15:04 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेषह्या आठवड्यात आपण संबंधांवर लक्ष केंद्रित कराल ज्यात सुरवातीस कौटुंबिक, प्रणय संबंध व संतती संबंध केंद्रस्थानी असतील. आपण जर सध्या संपत्ती खरेदीचा विचार करत असाल तर वाटाघाटी करताना सावध राहा, व कोणताही निर्णय घाइघाईत घेऊ नका. व्यावसायिक आघाडीवर अचानक खर्चामुळे आपली बेचैनी वाढेल. थोडक्यात व्यापार, आर्थिक बाबी व आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

वृषभ 

हा आठवडा सामाजिक कार्यांसाठी अनुकूल आहे. आपल्या सामाजिक जीवनात अधिक सक्रियता येऊन आपण एखाद्या नवीन गटाचे सभासद सुद्धा होऊ शकाल. व्यावसायिक आघाडीवर आपल्या कार्यनिष्ठेने आपण प्रगती साधू शकाल. सध्या कामात आपली सार्वजनिक प्रतिष्ठा मदतरूप ठरेल. देशांतर्गत कामात विलंब होण्याची शक्यता आहे, ज्यात विशेषतः ऑर्डर मंजूर होण्यात विलंब, पाठवलेला माल एखाद्या ठिकाणी अडकून पडणे इत्यादींची शक्यता आहे. आणखी वाचा

मिथुन

आठवड्याच्या सुरवातीस आपला अंतरात्मा आपणास दैनिक कार्या पासून वेगळे होण्यास प्रोत्साहित करेल. आपण कुटुंब व मित्रांवर अधिक लक्ष केंद्रित कराल. ह्या आठवड्यात आपण प्रणयी जीवनावर सुद्धा अधिक लक्ष केंद्रित कराल व त्यामुळे उत्तरार्धात आपल्यातील आत्मीयता, सहवास इत्यादीत वाढ होईल. आप्तांकडून मिळालेली उब आपला आशावाद वाढवेल. विवाहितांनी जोडीदाराशी नम्रतेने राहावे. आणखी वाचा

कर्क

आठवड्याच्या सुरवातीस आपल्या व्यक्तिगत जीवनात काही मर्यादा किंवा अडथळे आल्यास आश्चर्यचकित होऊ नका. ह्या व्यतिरिक्त आपल्या वैवाहिक जीवनात काही समस्या किंवा असंतोष असल्यास हि भावना प्रबळ होऊन आपली अधीरता व वागणुकीतील आक्रमकपणा वाढेल. त्यामुळे संबंधात कटुता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आणखी वाचा

सिंह

आठवड्याच्या सुरवातीस संबंधांची समीकरणे अधिक दृढ होतील. उत्तम विनोदवृत्ती व आशावादाने जीवनाप्रती आपला दृष्टिकोन अधिक व्यापक होईल. आपणास आध्यात्मिक व बौद्धिक दृष्ट्या फायदा होऊ शकेल अशा एखाद्या व्यक्तीचा संपर्क साधण्यासाठी हा आठवडा अनुकूल असल्याचे दिसत आहे. नवीन संबंधांची सुरवात करून जीवनातील नव्या अध्यायाचा प्रारंभ करण्यास हा आठवडा शुभ आहे. आणखी वाचा

कन्या 

जीवनात चढ - उतार येत असतातच हे आपण आठवड्याच्या सुरवातीस लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. सुरवातीस विचारातील उग्रता व अधिपत्याच्या भावनेत वृद्धी झाल्याने आपले नुकसान होईल. नोकरीच्या ठिकाणी जपून काम करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळाले तरी आपणास योग्य निर्णय घेण्यात विलंब होईल. संततीशी मतभेद टाळावेत. आठवड्याच्या मध्यास ग्रहांच्या स्थितीत अनुकूल बदल झाल्याने आपले विचार सकारात्मक होतील. आणखी वाचा

तूळ

पूर्वार्धात आपण प्रणयी जीवनात प्रगती साधू शकाल. जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुद्धा आठवड्याची सुरवात आशास्पद असल्याचे दिसत आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. पूर्वार्धात आपणास काही ना काही लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्र किंवा आप्तांसह प्रवासाची शक्यता आहे, परंतु प्रवासा दरम्यान आपली आर्थिक फसवणूक किंवा आरोग्य विषयक समस्या उदभवण्याच्या शक्यतेमुळे ह्या बाबतीत काळजी घ्यावी. आणखी वाचा

वृश्चिक 

आठवड्याच्या सुरवातीस काम करण्याच्या उत्साहात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. सार्वजनिक जीवनात यश व कीर्ती लाभ होईल. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यावर खर्च होईल, परंतु त्यांच्या प्रगती समोर हा खर्च नगण्यच असेल. वाचन - लेखनात आपली गोडी वाढेल. आठवड्याच्या मध्यास पिता किंवा पैतृक संपत्ती द्वारा लाभ होईल. सरकार किंवा त्यांच्याशी असलेल्या आर्थिक व्यवहारात फायदा होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम कामगिरी करू शकतील. आणखी वाचा

धनु 

आठवड्याच्या सुरवातीस नोकरी - व्यवसायात अनुकूलता असल्याचे जाणवेल. मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्य सुरु करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात विस्तार किंवा नोकरीत चांगल्या पगारा बद्धल गंभीरपणे विचार करावा. आठवड्याच्या मध्यास प्रतिस्पर्धी व विरोधकांवर मात करू शकाल. एकंदरीत हा आठवडा भाग्यवृद्धी व उत्साहवर्धक आनंद देणारा आहे. कार्यसिद्धी व मानसिक शांती आपणास कल्पना विश्वात घेऊन जाईल. आणखी वाचा

मकर 

आठवड्याच्या सुरवातीस एखाद्याच्या बोलण्यामुळे व वागणुकीमुळे आपण असंतोषाच्या भावनेत गुरफटले जाल. प्रतिस्पर्ध्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपण त्यांच्यावर मात करू शकाल. व्यावसायिक आघाडीवर व संबंधात सुरवात संथ गतीने किंवा प्रतिकूलतेने होईल. मात्र, आठवड्याच्या मध्यास व्यावसायिक अपयश किंवा पूर्वी झालेल्या चुकांबद्धल रडत बसण्या ऐवजी चुका सुधारून यश प्राप्तीसाठी प्रयत्न केल्यास फायदाच होईल. आणखी वाचा

कुंभ

ह्या आठवड्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध व्यावसायिक क्षेत्रास अनुकूल आहे. आठवड्याच्या मध्यास कामात लक्ष लागणार नाही. धनहानी संभवते. उत्तरार्धात विदेशातील व्यापारी वर्गाकडून चांगली बातमी मिळू शकेल. गोड बोलून आपली कामे करवून घेऊ शकाल. सुरवातीस वैवाहिक जीवनात सौख्याची अनुभूती येईल. पत्नी, पुत्र व वडिलधाऱ्यांकडून लाभ होईल. आठवड्याच्या मध्यास आपल्या अहंकारामुळे एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन

आठवड्याच्या सुरवातीस व्यावसायिक बाबींवर आपण अधिक लक्ष देऊ शकाल. विशेषतः नोकरी करणाऱ्यांना आपले कौशल्य दाखवून पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्याची चांगली संधी मिळू शकते. आपणास नोकरीत व व्यापार - व्यवसायात लाभ होईल. पुत्र व पत्नीकडून सुद्धा लाभ होईल. वडीलधाऱ्या व्यक्ती सुद्धा आपल्या लाभास कारणीभूत ठरतील. नोकरीत अजून सुद्धा वरिष्ठां पासून सावध राहावे लागेल, मात्र पूर्वीच्या तुलनेत परिस्थितीत नक्कीच सुधारणा होईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष