शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 30 जून ते 6 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 11:27 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवड्याच्या सुरुवातीस कोणत्याही कामात आपले लक्ष लागणार नाही, मात्र उत्तरार्धात त्यात काहीसा बदल घडून येईल. या आठवड्याच्या सुरुवातीस कोणत्याही कामात उत्साह वाटणार नाही. सुरुवातीस नोकरीत सुद्धा आपले मन रमणार नाही. कार्यालयात विरोधक सक्रिय होतील. आपण नोकरीत बदल करण्याचा गांभीर्याने विचार करू लागाल. व्यापार वृद्धीसाठी आपण एखादी योजना तयार करू शकाल... आणखी वाचा

वृषभ 

आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी विशेष अशी चांगली नसली तरी उत्तरार्धात त्यात सुधारणा होईल. या दरम्यान आपल्यावर एखादी जबाबदारी सोपवली जाईल. कार्यस्थळी सुद्धा कामाचा अतिरिक्त भार वाढण्याची शक्यता आहे. स्वतः हून जवाबदारी स्वीकारल्याने आपणास उद्दिष्टे गाठण्यात अडचणी येतील. प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे.  नित्य कार्याकडे आपले दुर्लक्ष होईल... आणखी वाचा

मिथुन

आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी जरी प्रतिकूलतेने झाली तरी दुसऱ्या पर्वात थोडा बदल होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. कार्यालयीन कामात आपले मन रमेल.आठवड्यात शेअर्स किंवा सट्ट्यात गुंतवणूक न करणे आपल्यासाठी हितावह ठरेल. आठवड्याच्या अखेर पर्यंत एखादे काम पूर्ण न झाल्याने आपणास बेचैनी जाणवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करावे लागेल, आठवड्यात नातेवाईकांशी आपला वाद उदभवू शकतो... आणखी वाचा

कर्क

आठवड्याची सुरुवात चांगली झाल्याने आपणास शारीरिक व मानसिक प्रसन्नता जाणवेल. मात्र, दुसऱ्या पर्वात थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपणास एखाद्या ठिकाणाहून थोडा आर्थिक लाभ होऊ शकेल. विरोधकांवर आपण मात करू शकाल. नंतर दैनंदिन कामात आपले लक्ष लागणार नाही. कामाच्या बाबतीत काही गोंधळ उडू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा 

सिंह

आठवड्याची सुरुवात नोकरी व व्यापार करणाऱ्यांसाठी चांगली होईल. मात्र, व्यापारात भागीदारी असल्यास आपणास सावध राहावे लागेल. आठवड्यात नवीन उद्दिष्टे आपला पाठलाग करतील. कार्यालयीन सहकाऱ्यांशी संवाद साधताना नरमाईचे धोरण ठेवावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या वादापासून आपणास दूर राहावे लागेल. एखाद्या अनावश्यक कामात आपला पैसा खर्च होईल. आठवड्याच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना अभ्यासात काही त्रास होणार नाही... आणखी वाचा

कन्या

आठवड्याची सुरुवात चांगली होईल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल असल्याचे दिसून येईल. व्यापारीवर्ग किंवा नोकरी करणार्यांना एखाद्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बाहेरगांवी जावे लागेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. व्यापाऱ्यांना भागीदारीत फायदा होऊ शकेल. ह्या आठवड्यात नोकरी - व्यवसायातील परिस्थिती आपणास अनुकूल राहील. आठवड्यात मांगलिक किंवा धार्मिक कामासाठी आपला पैसा खर्च होईल... आणखी वाचा

तूळ

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण व्यापारासाठी घेतलेल्या कष्टाची फळे मिळण्यास सुरुवात होईल. आठवड्यात कोणत्याही विरोधकाशी किंवा प्रतिस्पर्ध्याशी वाद घालू नका. व्यावसायिक कामासाठी धावपळ सुरूच राहील. एखादे खास काम आपण हाती घ्याल. व्यापारीवर्ग आपल्या व्यापाराची वृद्धी करण्याचा विचार करू शकतील. नोकरी करणाऱ्यांना आठवड्यात बराचसा आराम मिळू शकेल... आणखी वाचा

वृश्चिक

हा आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला आहे. एखाद्या धार्मिक प्रवासाच्या नियोजनामुळे आपणास आध्यात्माची गोडी लागेल. आर्थिक वृद्धीसह मान - सन्मानात सुद्धा वाढ होईल. जमीन - जुमल्याशी संबंधित कामासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. नोकरी व व्यावसायिक क्षेत्रासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात आपणास काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्चांमुळे आपले मन खिन्न होईल... आणखी वाचा

धनु

महिन्याचा पहिला आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आठवड्यात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून आपल्या प्राप्तीत वाढ होईल. या दरम्यान एखादा कायदेशीर त्रास होऊ शकतो. विरोधक सक्रिय होतील, मात्र आपण त्यांच्यावर मात करू शकाल. मात्र, जमीन - जुमल्याशी संबंधित कामात त्रास होऊ शकतो. थकव्यामुळे दैनंदिन कामात विलंब होण्याची शक्यता आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे... आणखी वाचा

मकर 

आठवडा आपणास मिश्र फले देणारा आहे. मात्र, आर्थिक दृष्ट्या आपणास एखादा लाभ होऊ शकतो. व्यापार - व्यवसायाच्या उन्नतीसाठी आपणास नशिबाची साथ मिळू शकेल. आठवड्यात आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. ह्या आठवड्यात आपण नवीन वस्त्रालंकार खरेदी करण्याचा विचार करून तो अंमलात सुद्धा आणू शकाल. दलाली, कमिशन व व्याज ह्यातून आपल्या प्राप्तीत वाढ होईल. व्यापार - व्यवसायातील वसुली होऊ शकेल... आणखी वाचा

कुंभ

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास काही त्रास होण्याची शक्यता आहे. एखादी अनामिक भीती आपणास सतावत राहील, मात्र त्यातून आपण बाहेर पडू शकाल. आठवड्याच्या मध्यास स्थितीत सुधारणा होईल. ह्या आठवड्यात खर्च कमी झाल्याने आपली आर्थिक स्थिती भक्कम राहील. सकारात्मक विचाराने खोळंबलेली कामे पूर्ण करू शकाल. भागीदारीतून फायदा होऊ शकेल... आणखी वाचा

मीन 

आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला आहे. आठवड्यात काम करताना अनेकदा आपल्या समोर प्रश्न निर्माण होतील. मानसिक चिंतेने मन उदास होईल. आपणास आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. एकावेळी एकच काम करणे आपल्या हिताचे होईल. शक्यता पडताळून आपले ध्येय प्राप्त करावे. संतती, कुटुंब व कार्यालय ह्यात समतोल साधावा लागेल. काहीवेळा एकटे राहण्याचा विचार मनात येऊ लागेल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष